पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व पक्षांकडून सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला जनतेच्या बाजूने कौल दिला आहे. त्यानंतर विधानसभेतही राज्यात यश मिळेल असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा मिळाव्यासाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे.
राज्यातील अनेक जागांवर महाविकास आघाडीकडून दावा करण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेते आग्रही असून विविध जागांवरती आपला दावा सादर करत आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडून आघाडीची बिघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षश्रेष्ठींकडून पुण्यातील ८ पैकी ६ जागांवर दावा केला आहे. त्यातच आता शरद पवार गटाकडून दावा केलेल्या ६ जागांपैकी ५ जागांवर आता शिवसेनेला हव्या आहेत.
पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून ६ विधानसभा जागांवर दावा करण्यात आला आहे. यामध्ये हडपसर ,पर्वती, वडगाव शेरी, खडकवासला यांच्यासह शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट मतदार संघाचा समावेश आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटकडून देखील कोथरुड, पर्वती, हडपसर वडगाव शेरी, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट या ६ मतदारसंघांवरती दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये मोठा तिढा होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांनी पालिकेकडून ‘तो’ महत्वाचा अधिकार काढला अन् पुणे पोलिसांकडे सोपवला
-महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता; नेमकं कारण काय?
-रवींद्र वायकरांच्या नातेवाईकांने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन; तपासात धक्कादायक माहिती
-‘भाजपचा अजिंक्यपणा फोल, हे सरकार किती दिवस चालेल? हा मोठा प्रश्न’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा