पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असून हा मुद्दा वारंवार चर्चेत येत आहे. अशा घटनांना वाहनचालकांचा बेशिस्त, बेफिकीरपणा तसेच वाहतूक प्रशासनातील काही त्रुटी देखील कारणीभूत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
रस्त्यावरील सिग्नलची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी ही पुणे महानगरपालिकेकडे होती. मात्र, आता अजित पवार यांनी हे अधिकार महानगरपालिकेकडून काढून घेत पुणे पोलिसांकडे सोपवले आहेत. त्यामुळे आता सिग्नल यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्तीसाठी येणार सर्व निधी पुणे पोलिसांना मिळणार आहे. सध्याच्या घडीला शहरातील जवळपास ५०% सिग्नल बंद अवस्थेत आहेत. आता हे सगळे सिग्नल सुरू करणे, ही पुणे पोलिसांची जबाबदारी असेल. ही जबाबदारी पुणे पोलीस पेलू शकतील का, हे आता पाहावे लागेल.
अजित पवार यांनी दिलेल्या निर्णयानुसार, आता पुणे शहरातील रस्त्यांवर असणारे सिग्नल सांभाळण्याची जबाबदारी पुणे पोलीस दलाकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी रस्त्यावरील सिग्नलची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी ही पुणे महानगरपालिकेकडे होती. हा संपूर्ण विषय पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारित आणि अधिकारात येत असल्याने रस्त्यावरील एखादा सिग्नल बंद पडल्यानंतर तो दुरुस्त करण्यासाठी पोलिसांना महानगरपालिकेत चकरा माराव्या लागत होत्या.
शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचू नये, रस्त्यावर वाहतूक कोंडी होवू नये, म्हणून सर्व विभागांनी समन्वय ठेवून तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांना पावसात कोणत्याही प्रकारची अडचण होवू नये म्हणून दक्षता बाळगावी, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता; नेमकं कारण काय?
-रवींद्र वायकरांच्या नातेवाईकांने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन; तपासात धक्कादायक माहिती
-‘भाजपचा अजिंक्यपणा फोल, हे सरकार किती दिवस चालेल? हा मोठा प्रश्न’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा