मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातत महाविकास आघाडीला चांगलेच यश मिळाले आहे. त्यातच आता ४८ पैकी ३० जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात मिळाल्या आहेत. तसेच महायुतीला अवघ्या १७ जागांवर विजय मिळाला असून सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांचादेखील महाविकास आघाडीला पाठिंबा काँग्रेसला मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुंबईत एकत्रित येत संयुक्त परिषद घेतली. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सणसणीत टोला लगावला आहे.
“नरेंद्र मोदींनी ज्या-ज्या मतदारसंघात सभा घेतल्या, रोड शो घेतले, त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला. मोदींनी १८ सभा आणि एक रोड शो घेतला होता. त्याठिकाणी आमच्या उमेदवारांना मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला. म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पंतप्रधान मोदींच्या जेवढ्या अधिक सभा आणि दौरे होतील. तेवढे आम्हाला स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल. त्यामुळे मोदींना धन्यवाद दिले पाहीजेत”, असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर संघाच्या मुखपत्रातून टीका केली आहे. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “भाजपला जो अनुभव आला तो त्यांनी सांगितला आम्ही त्यामध्ये काही बोलू इच्छित नाही.”
महत्वाच्या बातम्या-
-केंद्रीय राज्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मोहोळ पहिल्यांदाच पुण्यात; विमानतळावर जंगी स्वागत
-आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता पुणे पोलिसांनी कोणाकडे सोपवला?
-गजा मारणेसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलेश लंके म्हणतात, ‘मी त्याच्या घरी…’
-विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार का?, अजितदादांच्या आमदाराचं सूचक वक्तव्य
-जानाई-शिरसाई योजनेची बंदीस्त पाईपलाईन होणार; अजित पवारांनी किती कोटींचा दिला निधी?