पुणे : पुणे जिल्ह्यातील देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले होते. जिल्ह्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये एका कारखान्यातून जप्त करण्यात आला होता. ३ हजार ६७४ कोटी रुपयांचा मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. आता या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलिसांकडून मुंबईतील अमली पदार्थ विरोधी विभागाकडे सोपवण्यात आला आहे. हे प्रकरण १० जून रोजी एनसीबीकडे सोपवण्यात आले आहे.
‘कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतून एक हजार ८२६ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी कागदपत्रे एनसीबीकडे सोपविली’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. या प्रकरणाची व्याप्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर असल्यामुळे एनसीबीने पुणे पोलिसांना पत्र देऊन हा तपास त्यांच्याकडे देण्याबाबत विनंती केली होती.
पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये मेफेड्रोन विक्री, तस्करी प्रकरणात पोलिसांनी सोमवार पेठेत कारवाई करून गुंड वैभव उर्फ पिंट्या माने, साथीदार अजय करोसिया, हैदर शेख यांना पकडले होते. शेखच्या विश्रांतवाडीतील गोदामात छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन, कच्चा माल जप्त केला होता. तपासात विश्रांतवाडी, सोमवार पेठेतून जप्त करण्यात आलेले मेफेड्रोन कुरकुंभ येथील अर्थकेम कंपनीत तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानतंर कंपनी मालक भिमाजी साबळे, रासायनिक अभियंता युवराज भुजबळ, आयुब मकानदार यांना अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-गजा मारणेसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलेश लंके म्हणतात, ‘मी त्याच्या घरी…’
-विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार का?, अजितदादांच्या आमदाराचं सूचक वक्तव्य
-जानाई-शिरसाई योजनेची बंदीस्त पाईपलाईन होणार; अजित पवारांनी किती कोटींचा दिला निधी?
-पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये! पुण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मोहोळ दिल्ली दरबारी सक्रीय
-पब, बार, रेस्टॉरंटनंतर पीएमआरडीएची आता अनधिकृत होर्डिंगवर कारवाई