पुणे : अहिल्यादेवी नगरचे (अहमदनगर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे आमदार निलेश लंके हे काल (१४ जून) रोजी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या घरी जाऊन भेटळ घेतली आणि गजा मारणेकडून निलेश लंके यांचा सत्कारही करण्यात आला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर निलेश लंकेंवर चांगलीच टीकेची झोड उठवण्यात आली. त्यावर आता निलेश लंके यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
‘मी त्या व्यक्तीला ओळखत नाही. रस्त्याने जाताना त्यांनी हात केला आणि मी त्यांच्या घरी चहा प्यायला गेलो’, असे तकलादू स्पष्टीकरण निलेश लंके यांनी दिले आहे. पुणे पोलीस याविषयी काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. गजा मारणेने निलेश लंकेंसोबत गप्पा मारतानाचा आणि सत्कार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावरुन राज्याच्या राजकारणातून मोठी टीका करण्यात आली आहे. मात्र असे व्हिडीओ शेअर करुन गजा मारणे हा आपले राजकीय संबंध प्रदर्शित करत पुणे पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
सविस्तर बातमीसाठी- खासदार निलेश लंकेंची कुख्यात गँगस्टरसोबत भेट, राजकीय वर्तुळात खळबळ
गजा मारणेवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मारणेने खासदार लंके यांचा सत्कार केल्याची चित्रफित व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरातील कुख्यात गुंडांसह भुरट्या गुन्हेगारांची देखील परेड घेतली होती.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार का?, अजितदादांच्या आमदाराचं सूचक वक्तव्य
-जानाई-शिरसाई योजनेची बंदीस्त पाईपलाईन होणार; अजित पवारांनी किती कोटींचा दिला निधी?
-पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये! पुण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मोहोळ दिल्ली दरबारी सक्रीय
-पब, बार, रेस्टॉरंटनंतर पीएमआरडीएची आता अनधिकृत होर्डिंगवर कारवाई
-Sushant Singh Rajput : सुशांतच्या आठवणीत अंकिता पुन्हा भावूक, खास दिवशी शेअर केला फोटो…