पुणे : राज्यात कांदा प्रश्नावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांदा प्रश्नावरुन रान पेटले होते. त्यातच आता कांदा उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढावा, असे केंद्राला कळवण्यात आले होते. पण समाधानकारक तोडगा न निघाल्याने लोकसभा निवडणुकीत नाशिक, पुणे, नगर आणि सोलापूर या ४ जिल्ह्यांमध्ये महायुतीला फटका बसल्याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी कांदा प्रश्नामुळे महायुतीला राज्यात फटका बसल्याचे बोलले आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी मी दिल्ली येथे गेलो होतो. तेव्हा अमित शहा आणि पियुष गोयल यांना देखील कांदा प्रश्नाबाबत कल्पना दिली’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
‘जळगाव, नाशिक, पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा उत्पादन घेतात. कांदा प्रश्न पेटल्यानंतर कांदा उत्पादकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे कांदा उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढण्याबाबत केंद्राला आम्ही सांगितले होते. मात्र, तोडगा न निघाल्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि रावेर वगळता नाशिक, पुणे, नगर आणि सोलापूर येथील जागांवर महायुतीला फटका बसला’, असे अजित पवार असे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांवर टीका; अजित पवार म्हणाले, ‘लोकशाहीत…’
-पावसाळ्यात दूध पित आहात? होऊ शकते नुकसान, वाचा काय परिणाम होतात?
-सुषमा अंधारे यांनी दिलेल्या ऑफरवर रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘त्या माझ्या मैत्रीण…’
-जगताप दीर भावजईच्या वादात भाजपच्या निष्ठावंताने घेतली उडी; केला ‘हा’ गंभीर आरोप
-खासदार निलेश लंकेंची कुख्यात गँगस्टरसोबत भेट, राजकीय वर्तुळात खळबळ