पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभेची तयारी सर्व पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आमदार अश्विनी जगताप यांच्या मतदारसंघावर दीर पिंपरी- चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दावा केला आहे. त्यावरु भाजपमध्ये एका निष्ठावंताने जगताप दीर-भावजईला विरोध केला असून महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील दिर-भावजय हे एकच आहेत. उमेदवारीवरुन दोघे गृहकलह दाखवून, भाजपवर दबाव टाकत आहेत. याद्वारे त्यांना आपल्या घरातच पद राखायचे आहे, असे भाजपचे माजी सरचिटणीस अमोल थोरातांनी केला आहे. थोरात हे एकेकाळी दिवंगत लक्ष्मण जगतापांचे निकटवर्तीय होते. मात्र, आता आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप या दिर-भावजईच्या राजकारणात भाजपच्या निष्ठवंतांची गळचेपी होत आहे, असा आरोप अमोल थोरात यांनी केला आहेत.
पार्श्वभूमीवर राजकीय स्वार्थ, घराणेशाही आणि गृहकलह असा उल्लेख करून एक व्यंगचित्र ही थोरातांनी काढले आहे. ‘लक्ष्मण जगतापांची मीच खरी उत्तराधिकारी आहे. मी आगामी चिंचवड विधानसभा लढणार’, असे ठामपणे अश्विनी जगताप म्हणाल्या आहेत. त्यामुळे बारामतीतील पवार कुटुंबाप्रमाणे चिंचवडमधील जगताप कुटुंबात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा गृहकलह निर्माण होण्याची चिन्ह आहेत. आणि त्यातच थोरातांनी केलेल्या आरोप केल्यानंतर आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-खासदार निलेश लंकेंची कुख्यात गँगस्टरसोबत भेट, राजकीय वर्तुळात खळबळ
-राजकारणात बारामतीच श्रीमंत; एकट्या पवार कुटुंबात इतकी पदे
-महायुतीत तिढा; पुण्यातील ‘या’ २ जागांवर अजित पवार गटाचा दावा, भाजपची काय भूमिका असणार?
-“पोलिसांच्या दुर्लक्षावर पुन्हा शिक्कामोर्तब…” गंगाधाम चौक अपघातानंतर मेधा कुलकर्णी आक्रमक
-ससून रुग्णालयाचा आणखी एक अजब कारभार; उपचार केंद्र की लुटरुंचं केंद्र? नेमका काय प्रकार