पुणे : पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरामध्ये गंगाधाम चौकात आज दुपारी झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची दखल आता भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दखल घेतली असून मेधा कुलकर्णी यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दोषी वाहनचालक तसेच स्थानिक पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करणेबाबत पत्र लिहले आहे.
‘गंगाधाम चौकातील शत्रुंजय रोडवर झालेला आजचा अपघात हा पुन्हा वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षावर शिक्कामोर्तब करणारा आहे. या रस्त्याने जड वाहनांच्या वाहतुकीला दिवसा बंदी असताना राजरोसपणे येथे जड वाहने येतातच कशी? आजचा हा डंपरच्या धडकेने झालेला अपघात इतका प्रचंड होता की महिला भगिनी तत्क्षणी दिवंगत झाली. या दोषी असणाऱ्या सदर वाहनचालकाला शिक्षा होईलच पण सदर भागातील वाहतूक अधिकारी सुद्धा या घटनेला जबाबदार आहेत. त्यामुळे येथील विविध स्तरावरील वाहतूक अधिकारी कोण त्यांची माहिती मिळावी व त्यांना त्वरित कार्यमुक्त करावे”, असे मेधा कुलकर्णी या पत्रामध्ये नमूद केले आहे.
तसेच पुण्याच्या इतर भागात अशा प्रकारांची, अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी आम्ही आग्रही मागणी करीत आहे, असेही मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत. दरम्यान, अपघात झालेल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामे सुरु आहेत. या भागात जड वाहनांना बंदी असूनही बांधकामाच्या मालाची जड वाहने या रस्त्याने जात असतात. बांधकाम व्यावसायिकांचे ट्रक, मिक्सर तीव्र उतारावरुन ये-जा करतात. त्यातच वाहतूक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास राजकारणी आणि लोकप्रतिनिधींकडून पोलिसांवर दबाव टाकला जातो. या सर्व प्रकारामुळे आज एका महिलेचा बळी गेला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ससून रुग्णालयाचा आणखी एक अजब कारभार; उपचार केंद्र की लुटरुंचं केंद्र? नेमका काय प्रकार
-आता पुण्याच्या या भागातही करता येणार बसने प्रवास; वाचा पीएमपीएमएल प्रशासनाचा महत्वाचा निर्णय
-पुण्यात आणखी एक भीषण अपघात; डंपरने महिलेला चिरडले, महिलेचा जागीच मृत्यू
-पावसाळ्याच्या दिवसांत पचनशक्ती मंदावते; काय खावे काय खाऊ नये?
-‘२ दिवस थांबा सगळं सरळ करु’; शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर शरद पवारांचे आश्वासन