पुणे : पुणे जिल्हा ससून रुग्णालयाचे नाव गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणी याच रुग्णालयामध्ये अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. त्या प्रकरणी ससून रुग्णालयातील कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर रुग्णलयातील २ डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता याच रुग्णालयामधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
पुण्याच्या ससून रुग्णालयात गरीब रुग्णांकडून पैसे उकळले जात असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. रुग्णांची शस्त्रक्रिया याेजनेतून माेफत झाली असताना, बाहेरून साहित्य आणायला सांगितले जात आहे. तसेच या रुग्णालयामधील डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना २४ हजार ५०० रुपये भरण्यासाठी सांगितले. त्यामुळे आता या रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून ससून रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
रुग्णाच्या नातेवईकांना पैसे भरण्यासाठी दमदाटी देखील करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकाईंनी पुण्यात पत्रकार परिषद घेत हे आरोप केले असून हे व्हिडीओ देखील व्हायरल केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणावरुन देखील पुन्हा एकदा ससून रुग्णालयाचे नाव समोर येत आहे. यावर आता डॉक्टरांवर काय कारवाई होणार हे पाहणंं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आता पुण्याच्या या भागातही करता येणार बसने प्रवास; वाचा पीएमपीएमएल प्रशासनाचा महत्वाचा निर्णय
-पुण्यात आणखी एक भीषण अपघात; डंपरने महिलेला चिरडले, महिलेचा जागीच मृत्यू
-पावसाळ्याच्या दिवसांत पचनशक्ती मंदावते; काय खावे काय खाऊ नये?
-‘२ दिवस थांबा सगळं सरळ करु’; शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर शरद पवारांचे आश्वासन