पुणे : पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काल ११ जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत मोहोळ यांनी पदभार स्विकारला. विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी मुरलीधर मोहोळ यांना सहकार व नागरी उड्डाण खात्यामार्फत राज्यातील कामे करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
“सहकार व नागरी उड्डाण सारखे महत्वाचे खाते आपल्या मिळाले. यातून राज्यातील सहकार चळवळीला भरीव मदत होईल हीच अपेक्षा व्यक्त करतो. त्याच बरोबर पुणे विमानतळाचा प्रश्न, नवी मुंबई विमानतळाला गती, तसेच शिर्डी, नाशिक,जळगाव, कोल्हापूर, नांदेड, संभाजीनगर (औरंगाबाद), नागपूर अशा राज्यातील सगळ्या विमानतळांवरील विमानसेवांची संख्या वाढवणे, प्रवाशांना सुविधा सुधारणे हे कामही आपल्या पुढाकाराने होतील ही अपेक्षा व्यक्त करतो”, असे सत्याजीत तांबे म्हणाले आहेत.
मुरलीधर आण्णा,
सहकार व नागरी उड्डाण सारखे महत्वाचे खाते आपल्या मिळाले.
यातून राज्यातील सहकार चळवळीला भरीव मदत होईल हीच अपेक्षा व्यक्त करतो. त्याच बरोबर पुणे विमानतळाचा प्रश्न, नवी मुंबई विमानतळाला गती, तसेच शिर्डी, नाशिक,जळगाव, कोल्हापूर, नांदेड, संभाजीनगर (औरंगाबाद), नागपूर… https://t.co/hp1oHDfRaX— Satyajeet Tambe (@satyajeettambe) June 11, 2024
आपण नगरसेवक नसतांनाही सामाजिक कामात कसे सक्रिय होता, हे मी व्यक्तीशः पाहिले आहे, मी तर पुण्याला एमआयटी कॉलेजमध्ये असल्यापासून आपल्यासोबत काम करतो आहे. आपल्या गणेशोत्सव मंडळाचाही मी सदस्य होतो. त्यामुळेच आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. संधीचे सोने करा. महाराष्ट्राला महान राष्ट्र करण्याच्या प्रक्रियेत मोलाचे योगदान द्यावे हीच विनंती, असेही सत्याजीत तांबे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शिरूरमध्ये महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ वक्तव्याने मोठा वाद
-“बारामतीच्या विकासासाठी मोदींची मदत घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही”
-पुण्यात तुबलेल्या पाण्याने नागिकांचे हाल; सुप्रिया सुळेंनी पालिका प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा
-पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थांची खिचडीपासून सुटका; पोषण आहारात मिळणार ‘हे’ १५ पदार्थ
-‘ही तर तात्पुरती सूज’; महाविकास आघाडीच्या यशावर शिंदेंच्या मंत्र्याची फुंकर