पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या नावाची तुफान चर्चा रंगली. त्यानंतर केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाले. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदासह केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर आता शरद पवार यांनी बारामतीच्या विकासासाठी मोदींचीही मदत घ्यायला मागे-पुढे बघणार नाही, असे वक्तव्य केले आहे. बारामती येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत व्यापारी मेळावा पार पडला. यावेळी, बोलताना बारामतीच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.
“४८ पैकी आमच्या ३० जागा निवडून आल्या आता विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवले पाहिजे. आम्ही सत्तेत असताना काही धोरणे आखली, त्याचा फायदा आता दिसतो आहे. आता पुढील काळात बारामतीत आणखी मोठे उद्योग आणणार, यासाठी तुमचे सहकार्य पाहिजे, त्यासाठी हा कार्यक्रम आहे”, असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.
“इथे राजकारण आणायचे नाही राज्य आणि केंद्र सरकारशी बोलून मी प्लॅन करत आहे. आम्ही निवडणुकीमध्ये टीका-टिप्पणी केली. मोदींनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली. पण, मी त्यावर काही बोलणार नाही. विकासासाठी मोदींचीसुद्धा आगामी काळात मदत घ्यायला मी मागेपुढे बघणार नाही, असे म्हणत बारामतीच्या विकासाासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे”, असे पवार यांनी आपल्या भाषणातून सूचवले आहे.
“निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी कानावर येत होत्या, पण मी शांत होतो. मला मला माहिती होतं की बारामतीकर सुज्ञ आहेत, त्याचा अनुभव मला आला. मतदारांनी शहापणा दाखवला हे मी फक्त आज बघतो अस नाही, हा १९६७पासून बघतो आहे. पण, यंदा बारामतीची चर्चा न्यूयॉर्कमध्ये झाली. तुम्ही काय साधी लोक आहात, कुठपर्यंत जाऊन पोहोचलात”, असे म्हणत शरद पवारांनी बारामतीकरांचे कौतुकही केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात तुबलेल्या पाण्याने नागिकांचे हाल; सुप्रिया सुळेंनी पालिका प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा
-पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थांची खिचडीपासून सुटका; पोषण आहारात मिळणार ‘हे’ १५ पदार्थ
-‘ही तर तात्पुरती सूज’; महाविकास आघाडीच्या यशावर शिंदेंच्या मंत्र्याची फुंकर
-पावसाळ्यात गरम पाणी प्यायल्याने काय होते? जितके फायदे तितकेच तोटेही
-साखर सम्राटांना धक्का देण्याची तयारी, अमित शहांची भेट घेत मोहोळांनी स्वीकारला पदभार