पुणे : राज्यातील शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना खिचडी भात मिळत होता. मात्र प्रधानंत्री पोषण मुक्ती निर्माण योजनेंतर्गत शैैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून आहारामध्ये आता विद्यार्थ्यांना १५ पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. ३ संरचित आहार पद्धतीनुसार व्हेजिटेबल पुलाव, नाचणी सत्व, अंडा पुलाव, तांदळाची खिचडी अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्याच त्या खिचडीला स्वादिष्ट पर्याय उपलब्ध झाला आहे.
केंद्र शासनाने दिलेल्या सुचनेनुसार, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढवणे, आहारात वैविध्य आणण्यासाठी वृध्दिंगत करणे, आहारात वैविध्य आणण्यासाठी पाककृती सुधारणा समिती नियुक्त करण्यात आली होती. राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये निर्माण केल्या जात असलेल्या परसबागांतून उत्पादित भाजीपाला, फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा, सकस आहार मिळण्यास मदत होत आहे.
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थांना पोषण आहार दिला जातो. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो.
महत्वाच्या बातम्या-
-‘ही तर तात्पुरती सूज’; महाविकास आघाडीच्या यशावर शिंदेंच्या मंत्र्याची फुंकर
-पावसाळ्यात गरम पाणी प्यायल्याने काय होते? जितके फायदे तितकेच तोटेही
-साखर सम्राटांना धक्का देण्याची तयारी, अमित शहांची भेट घेत मोहोळांनी स्वीकारला पदभार
-वाहन चालकाकडून पैसे घ्याल तर होणार ‘ही’ मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांचा वाहतूक पोलिसांना इशारा