पुणे : पुणे शहरामध्ये कमी वेळेत अधिक पाऊस पडला असून अनेक भागातील घरामध्ये पाणी साठले होते. शहरात मुसळधार पाऊस पडला तर परत हीच परिस्थिती ओढवू शकते. या पार्श्वभूमीवर भाजपचे नवनिर्वाचित खासदार आणि सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या कामाचा पाठपुरावा करत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याबाबतच्या उपायोजना काय असतील याची विचारणा पालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे.
पुणे शहरात कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याचे प्रकार वारंवार होत असून यामुळे शहरातील काही स्पॅाटवर पाणी मोठ्या प्रमाणावर साचण्याचे प्रकार होत आहेत. यामुळे पुणेकरांना नाहक त्रास होत असून अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज (११ जून) नवी दिल्ली येथून व्हर्च्युअल पद्धतीने पुणे महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांसदर्भात बैठक घेतली. यात पाण्याचा निचरा वेळेत करणे, आपात्कालीन यंत्रणा सतर्क ठेवणे, पाणी साठणाऱ्या स्पॅाटवर विशेष उपाययोजना करणे, पाणी साठवण्याची कारणे शोधणे अशा विविध बाबींवर सूचना दिल्या. शिवाय याबाबत कृती आराखडा तयार करुन तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजना काय आहेत? याबाबतची माहिती मोहोळांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.
पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा !
पुणे शहरात कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याचे प्रकार वारंवार होत असून यामुळे शहरातील काही स्पॅाटवर पाणी मोठ्या प्रमाणावर साचण्याचे प्रकार होत आहेत. यामुळे पुणेकरांना नाहक त्रास होत असून अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. या… pic.twitter.com/yidFwsTUBn
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) June 10, 2024
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पुणे शहरात पूरपरिस्थितीनिर्माण होणाऱ्या ठिकाणी उपाययोजनांची कामे प्रस्तावित असून याला कामांना तातडीने स्थायी समितीची मान्यता द्यावी आणि लगेच ‘वर्क ॲार्डर’ देण्यासंदर्भातही सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कामांसाठी १४७ कोटी रुपयांची आवश्यकता असून सदर निधी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या माध्यमातून लवकरात लवकर प्राप्त करुन देण्यासाठी मी स्वतः पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
आज नई दिल्ली में भारत सरकार के सहकारिता मंत्रालय के राज्यमंत्री के रूप में पदभार ग्रहण किया। पदभर ग्रहण करने से पेहला सहकारिता मंत्री माननीय श्री अमित शाह जी कीं भेट की और मार्गदर्शन एवं आशीर्वाद लिए ।
देश के यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी आणि सहकारिता मंत्री… pic.twitter.com/W6zsFIpHpE
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) June 11, 2024
विशेष बाब म्हणजे, राज्य सरकारकडून पूर नियंत्रणासाठी आपण २०० कोटींचा विशेष निधी पुणे शहरासाठी आणला असून त्याबाबतच्या कामांच्या नियोजनाचा आढावाही यावेळी घेतला. शिवाय पुण्यात पुन्हा पहिल्या पावसासारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठीच्या स्पष्ट सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे आपात्कालीन व्यवस्थापनाचे फोन लागत नसणे आणि उचलत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, याबाबतही तातडीने यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
या बैठकीस महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पृथ्वीराज व्ही.पी., विद्युत विभाग प्रमुख श्रीनिवास कंदूल, सांडपाणी व्यवस्थापनचे श्री. संतोष तांदळे, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख श्री. गणेश सोनुने यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-वाहन चालकाकडून पैसे घ्याल तर होणार ‘ही’ मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांचा वाहतूक पोलिसांना इशारा
-स्मार्ट सिटी म्हणून गाजावाज केला त्याचं काय?; पुण्याच्या परिस्थितीवरुन सुप्रिया सुळे सरकारवर आक्रमक
-‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय…” कार्यकर्त्यांनी शरद पवारांपुढेच सांगितलं ‘या’ नेत्याचं नाव
-मोहोळांकडे सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्रालयाचा कार्यभार; गडकरी, गोयल, जाधवांकडे कोणते खाते?
-मनसेच्या साईनाथ बाबर यांच्या आंदोलनात वसंत मोरेंचीच चर्चा; वाचा नेमकं काय प्रकरण?