पुणे : पुणे शहरात अनेकांकडून वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन होत असते. अशात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वाहतूक पोलीस अडवून चिरीमीरी पैसे उकाळतात. अशा वाहतूक पोलिसांना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशारा दिला आहे. वाहन चालकांकडून पैसे उकाळणाऱ्या वाहतूक पोलिसांवर वचक ठेवण्यासाठी अमितेश कुमार यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
‘वाहन चालकांकडून लाच किंवा चिरीमिरी घेताना आढळल्यास संबंधित वाहतूक पोलीस अधिकाऱ्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे’, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे. शहरातील गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी फक्त गुन्हेगारांवरच नाही तर पोलिसांवर देखील अंकुश बसवला जाणार आहे. जर वाहतूक पोलिसांनी नागरिकांकडून विनाकारण पैसे घेतले, तर आता पोलिसांवरच खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे.
शहरातील मेट्रोचे काम, काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीची समस्या मोठी बनली आहे. अशा वाहतूक कोंडीतही वाहतूक पोलिसांकडून गाड्या उचल्याचे प्रकार किंवा वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. भीतीपोटी किंवा नियमाचे चूकून उल्लंघन झाले तर वाहन चालकही पैसे देत असतात. आता अशाच पोलिसांवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्मार्ट सिटी म्हणून गाजावाज केला त्याचं काय?; पुण्याच्या परिस्थितीवरुन सुप्रिया सुळे सरकारवर आक्रमक
-‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय…” कार्यकर्त्यांनी शरद पवारांपुढेच सांगितलं ‘या’ नेत्याचं नाव
-मोहोळांकडे सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्रालयाचा कार्यभार; गडकरी, गोयल, जाधवांकडे कोणते खाते?
-मनसेच्या साईनाथ बाबर यांच्या आंदोलनात वसंत मोरेंचीच चर्चा; वाचा नेमकं काय प्रकरण?