पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा पुण्यात पत्रकारांशी बोलताना राज्यातील फोडाफोडीच्या राजकारण आणि पुण्यातील गुन्हेगारी परिस्थिती अन् पावसामुळे ओढवलेल्या परिस्थितीवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. ‘पुण्यातील नागरी समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारकडे वेळ नसल्याचे सुचवत, आता पुण्यातील मंत्र्यांकडून हा प्रश्न मार्गी लागेल’, असा सणसणीत टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज पुणे शहरातील ज्या भागांमध्ये पाणी साठवून नुकसान झालं होतं. त्या भागाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
पुणे शहरात मल्टिपल गोष्टी सुरू आहेत. गुन्हेगारी वाढत आहे. कष्टाने लोक घरे घेतात, मात्र सर्व कोलमडलय, स्मार्ट सिटी म्हणून पुण्याला योजनेत घेतले. या सगळ्या अतिक्रमणावर कारवाई करा. फार अपेक्षा होत्या, पण त्या फोल ठरल्या आहेत. हडपसर परिसरात वाहने फोडण्यात आली. पुणेकर टॅक्स भरतो, नागरिक मला जाब विचारतात. नाल्यांचे प्लनिंग कोणी केले, याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार आहे. स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा केला, त्याच काय झालं? असं पुण्याने काय केलंय सरकार पुण्यावर एवढा अन्याय करतंय?, असा सणसणीत सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केला आहे.
“पुण्यातील प्रश्नांवर कोणीतरी बोलले पाहिजे ना? सगळेच व्यस्त आहेत घरे फोडण्यात, पक्ष फोडण्यात. त्यांचे कमी लोक निवडून आलेत. त्यांचे आकडे वाढवण्यासाठी सगळ्याचे प्रयत्न सुरु आहेत. नंबर वाढण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे पण ज्यांना या सर्वसामान्य लोकांनी निवडून दिले त्यांचेच प्रश्न सोडवण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय…” कार्यकर्त्यांनी शरद पवारांपुढेच सांगितलं ‘या’ नेत्याचं नाव
-मोहोळांकडे सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्रालयाचा कार्यभार; गडकरी, गोयल, जाधवांकडे कोणते खाते?
-मनसेच्या साईनाथ बाबर यांच्या आंदोलनात वसंत मोरेंचीच चर्चा; वाचा नेमकं काय प्रकरण?
-‘…अन् थेट मंत्रिपदाची माळ तुझ्या गळ्यात’; प्रवीण तरडेंनी मोहोळांसाठी केली खास पोस्ट