पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी काल राष्ट्रपती भवनात पार पडला. महाराष्ट्रातून सहा खासदारांची केंद्र सरकारमध्ये वर्णी लागली आहे. पुण्याचे नवनियुक्त खासदार मुरलीधर मोहोळ यांनी देखील राज्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्याकडे सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर नितीन गडकरी हे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
तब्बल 40 वर्षानंतर पुण्यातून लोकनियुक्त खासदाराची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये निवड करण्यात आली आहे. पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांचा अनपेक्षितपणे मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मोहोळ यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपने मराठा चेहरा देण्याची खेळी केली आहे. त्यांच्याकडे आता मंत्रालयाचा कार्यभार असणार आहे.
कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते
राजनाथ सिंह – संरक्षण
अमित शहा – गृह
नितीन गडकरी – रस्ते व वाहतूक
निर्मला सीतारामन – अर्थ
एस जयशंकर:- परराष्ट्र व्यवहार
जे पी नड्डा – आरोग्य
अश्विनी वैष्णव – रेल्वे
मनोहरलाल खट्टर – ऊर्जा आणि शहरी विकास
शिवराजसिंह चौहान – कृषी आणि ग्रामविकास
जीतन राम मांझी – लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग
राम मोहन नायडू – सिव्हील एव्हीएशन
मनसुख मांडवीय – क्रीडा मंत्री
किरण रिजीजू – संसदीय कामकाज मंत्री
चिराग पासवान – क्रीडा
गजेंद्र सिंग शेखावत – पर्यटन आणि सांस्कृतिक
सी आर पाटील – जलशक्ती
बातमी अपडेट होत आहे…..