पुणे : लोकसभा निकालानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातील ६ खासदारांची वर्णी लागली आहे. त्यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावरुन आता मोहोळ यांचे खास मित्र मराठी अभिनेते प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
काय आहे प्रवीण तरडेंची पोस्ट?
‘आज शब्द अपुरे पडतील, पण लेखन थांबायचं नाही. कित्येकजण योगायोगानं राजकारणात येतात पण तू काहीतरी ठरवून यामधे आलास.. राजकारणात येवून लोक समाजकारण लोणच्या सारखं वापरतात पण तु ते ताट भरून घेतलंस , पोटभरून रिचवलंस.. कदाचित म्हणुनच कोरोनाच्या महामारीत तु पुण्याला वाचवलंस’, असे म्हणत प्रवीण तरडेंनी मोहोळांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
“परम वैभवम नेतुमेतत स्वराष्ट्रम” या दैवी संदेशा पासून आपण थोडं दूरच आहोत.. येत्या पंचवीस वर्षात जितकं जमेल तितकं या दैवी संदेशाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू . पुण्येश्वराची पुण्याई तुझ्या पाठीशी आहेच बाकी मुळशीची शान, पुण्याचा अभिमान, भारत देशाचा स्वाभिमान ठरो. तुझं खुप अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा.’, असंही प्रवीण तरडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“हे तुमच्या पचनी पडणारे नाहीच…” मंत्री मुरलीधर मोहोळांनी सुप्रिया सुळेंना सुनावलं
-सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर खासदार करत केंद्रात मंत्रिपद द्या, राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी मागणी
-‘मैं दुसरों के घर मे क्यू झांकू’; सुप्रिया सुळेंचा निशाणा कोणाकडे?
-फेलोशिपसाठी मराठी विद्यार्थ्यांचा लढा; ‘सारथी’ पीएचडीच्या विद्यार्थ्यांकडून कार्यालयासमोर आंदोलन
-एनडीएमधील धूसफूस चव्हाट्यावर; मंत्रिमंडळ विस्तारावर श्रीरंग बारणे काय म्हणाले?