पुणे : पुणे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी काल केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. तब्बल २८ वर्षांनंतर पुण्यामध्ये लोकनियुक्त खासदाराला केंद्रात मंत्रीपद मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांसह पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोहोळ यांना शुभेच्छा देतानाच खोचक टोला लगावला होता. “पुण्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा पुणेकरांना व्हावा, ठेकेदारांना होऊ नये”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. आता मोहोळ यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला आहे.
“खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं. ताई, आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो” असा घणाघात मोहोळ यांनी केला आहे.
दरम्यान, ‘उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही’, असे म्हणत मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर खासदार करत केंद्रात मंत्रिपद द्या, राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी मागणी
-‘मैं दुसरों के घर मे क्यू झांकू’; सुप्रिया सुळेंचा निशाणा कोणाकडे?
-फेलोशिपसाठी मराठी विद्यार्थ्यांचा लढा; ‘सारथी’ पीएचडीच्या विद्यार्थ्यांकडून कार्यालयासमोर आंदोलन
-एनडीएमधील धूसफूस चव्हाट्यावर; मंत्रिमंडळ विस्तारावर श्रीरंग बारणे काय म्हणाले?
-केंद्रातील मंत्रिपदाच्या बदल्यात अजित पवार गटाने केली ‘ही’ मोठी मागणी