पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजे सारथी संस्थे अंतर्गत संशोधन करणाऱ्या कुणबी व मराठा समाजातील विद्यार्थ्यांना (अधिछात्रवृत्ती) फेलोशिप दिली जाते. फेलोशिपसाठी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. यावरुन पुण्यातील सारथीच्या कार्यालयासमोर आंदोलन करत मराठी विद्यार्थी आणि स्वराज्य संघटनेने राज्य सरकारला इशारा दिला आहे.
माजलेल्या मगरुर अधिकाऱ्यांना जागेवरर आणण्यासाठी आम्ही स्वराज्याच्या वतीने मराठा समाजाच्यावतीने अनेक आंदोलने केली. तरीही बोक्यांना जाग आली. लोकसभा निवडणूक झाली, मंत्रिमंडळ विस्तार झाला, पंतप्रधान, मंत्र्यांचा शपथविधीही झालेला आहे. या तिघाडी सरकारला आम्ही चेतावणी देत आहे. की मराठा विद्यार्थ्यांवर होणार अन्याय आम्ही सहन करणार नाही. तुमची जागा आम्ही तुम्हाला निवडणुकीत दाखवून दिली होती. आज या विद्यार्थ्यांची काय चूक आहे, हे शेतकऱ्याच्या, मराठ्याच्या पोटी जन्माला आलेत. जोपर्यंत मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार, असा इशारा स्वराज्य संघटनेच्या धनंजय जाधव यांनी राज्य सरकारला दिला आहे.
एमपीएससी यूपीएससी तारादूत इतर सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत या शासनाने या शासनाने फक्त अन्याय केला आहे. ‘यांच्या खुर्च्या खाली करा’ यासाठी हे आंदोलन आहे हे फक्त आंदोलन नाही, तर जनता दरबार आहे. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. या जनता दरबार मध्ये सहभाग नोंदवून आपले प्रश्न मांडले आहेत. या सर्वांना जागं करण्यासाठी यासारखी कार्यालयाबाहेर आम्ही झोपून आंदोलन करणार आहे. स्वायत्त संस्था करणार आहे. या प्रशासन मंडळांनी या ठिकाणच्या संस्थेच्या संचालकांनी यावं बैठक घ्यावी आणि आमचे प्रश्न सोडवावेत, असेही धनंजय जाधव म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-एनडीएमधील धूसफूस चव्हाट्यावर; मंत्रिमंडळ विस्तारावर श्रीरंग बारणे काय म्हणाले?
-केंद्रातील मंत्रिपदाच्या बदल्यात अजित पवार गटाने केली ‘ही’ मोठी मागणी
-‘वादा तोच दादा नवा’! बारामतीत नव्या दादाची एन्ट्री; सर्वत्र झळकले पोस्टर्स
-एकाच पावसात उडाली पुणेकरांची दाणादाण, शहरात पावसाने नेमकी काय परिस्थिती?
-बूथवरचा कार्यकर्ता ते केंद्रात मंत्री, मुरलीधर मोहोळ यांची मोदी सरकारमध्ये वर्णी; आजच शपथविधी