पुणे : देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि केंद्रात एनडीएचे सरकार आले. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झाले असून केंद्रातील मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. या मंत्रिमंडळात मंत्रिपदी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची वर्णी लागली आहे. मात्र, एनडीएमधील धूसफूस चव्हाट्यावर आल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. मंत्रिपद वाटपामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटावर अन्याय झाला, असल्याचे शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे म्हणाले आहेत.
एनडीए घटक पक्षाचा जुना साथीदार म्हणून शिवसेना हा पक्ष आहे. यावरुन शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं हि आमची मापक अपेक्षा होती. चंद्राबाबू नायडूंचे १६ खासदार निवडून आले, नितीश कुमारांचे १२ खासदार तर शिवसेना शिंदे गटाचे ७ खासदार निवडून आले आणि चिराग पासवान यांचे ५ खासदार निवडून आले तरीही त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. निदान शिवसेनेला १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्री पद मिळावं ही अपेक्षा होती, असे बारणे म्हणाले आहेत.
१ राज्यमंत्री पद देऊन आम्हाला ३५ व्या स्थानी शपथ घ्यावी लागली. पण कॅबिनेट मंत्री म्हणून आमच्या खासदाराने शपथ घेतली असती तर आम्हाला चांगलं वाटलं असतं. या खदखदीबाबत केंद्रीय नेतृत्वाला सांगितलं पाहिजे असे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना म्हटले आहे. या सर्व घडामोडींवर इतर पक्षांना एक न्याय आणि शिवसेनेला एक न्याय असं आम्हाला वाटतं, असे
विधानसभेच्या निवडणुका येत असताना घटक पक्षांना (राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना) केंद्रीय नेतृत्वाने न्यायी भूमिका द्यावी. अजित पवारांनी भाजपसाठी मोठी भूमिका घेतली आहे. जनतेकडून रोषही स्विकारला. भाजपने अजित पवारांनाही न्याय द्यायला हवा होता, असं आम्हाला वाटतं, असे श्रीरंग बारणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-केंद्रातील मंत्रिपदाच्या बदल्यात अजित पवार गटाने केली ‘ही’ मोठी मागणी
-‘वादा तोच दादा नवा’! बारामतीत नव्या दादाची एन्ट्री; सर्वत्र झळकले पोस्टर्स
-एकाच पावसात उडाली पुणेकरांची दाणादाण, शहरात पावसाने नेमकी काय परिस्थिती?
-बूथवरचा कार्यकर्ता ते केंद्रात मंत्री, मुरलीधर मोहोळ यांची मोदी सरकारमध्ये वर्णी; आजच शपथविधी
-पुण्याचे खासदार होताच मुरलीधर मोहोळांनी दिला पुणेकरांना ‘हा’ शब्द