बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार असा सामना रंगला होता. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर पहिल्यांदाच आमनेसामने आले. या लढतीला चांगलीच रंगत आली होती. महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना जास्त मताधिक्य मिळाले आहे.
बारामतीमध्ये लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही पवार विरुद्ध पवार असाच सामना रंगणार असल्याचे दिसत आहे. सुप्रिया सुळेंच्या अभिनंदनाच्या बॅनरवर शरद पवार गटाकडून नव्या दादाची पोस्टरबाजी करत आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला इशारा देण्यात आला आहे. ‘वादा तोच दादा नवा’, अशा आशयाचे बॅनर अजित पवार यांना विधानसभेसाठी इशारा देण्याकरताच लावण्यात आले आहेत.
आगामी विधानसभेत पुन्हा पवार गटात लढाई जुंपणार आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार असल्याचे चिन्हे आहेत. बारामतीमध्ये लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये युगेंद्र पवार म्हणजेच अजित पवारांचे पुतणे यांना ‘बारामतीचा नवीन दादा’ म्हटले आहे. यामुळे लोकसभेनंतर विधानसभेतही पुन्हा दोन्ही पवार गटात लढाई जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत विधानसभेला होऊ शकते. यानिमित्ताने बारामतीत काका विरुद्ध पुतण्या या संघर्षाचा नवा अंक बघायला मिळणार आहे’, अशी चर्चा सध्या बारामतीत सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
-एकाच पावसात उडाली पुणेकरांची दाणादाण, शहरात पावसाने नेमकी काय परिस्थिती?
-बूथवरचा कार्यकर्ता ते केंद्रात मंत्री, मुरलीधर मोहोळ यांची मोदी सरकारमध्ये वर्णी; आजच शपथविधी
-पुण्याचे खासदार होताच मुरलीधर मोहोळांनी दिला पुणेकरांना ‘हा’ शब्द
-‘अजितदादांकडे ५५ गायींचा गोठा’, ‘तुतारीवाले गोठा साफ करायला’; उत्तम जानकर- मिटकरी यांच्यात जुंपली
-पालिकेचा आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा आला समोर; ग्रेडसेपरेटरसाठी खोदलेल्या खड्ड्यात 4 मुली बुडाल्या