पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. अजित पवारांच्या ५५ गायींचा मुक्त गोठा आहे. यावरुन अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि उत्तमराव जानकर यांच्यात जुंपली आहे. जानकरांच्या या वक्तव्यावर अमोल मिटकरींनी उत्तर देताना शरद पवार गटावर चांगलीच टीका केली आहे.
“अजितदादा कधीच नेता नव्हते आणि होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी आता चांगल्या प्रतीच्या जर्सी गायी, होस्टेन ,बंगलोरी अशा गायीचे चांगले पैदास केंद्र सुरु करावेत यात ते यशस्वी होतील. दादांना राजकारणातले काही सुद्धा कळत नसले तरी ते धंद्यात हुशार आहेत. त्यांचा हा गोठा देशपातळीवर चांगला होईल आणि त्या गोठ्याला भेट देण्यासाठी मी देखील जाईन”, असे उत्तमराव जानकर म्हणाले आहेत. जानकरांच्या टीकेवर मिटकरांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
अमोल मिटकरींनी काढली लायकी
“उत्तमराव जानकरांनी बारामतीमध्ये यावं. अजितदादांच्या या फॉर्म मध्ये 55 गायीचा मुक्त गोठा आहे. सध्या गायीची देखभाल करायला एका ‘उत्तम’ माणसाची जागा रिक्त आहे. तुमची इच्छा असेल तर सालगडी म्हणून “उत्तम “काम करता येईल. तसेही तुतारीवाले गोठा साफ करायलाच ठेवणार होते. इथं लायकीचं काम मिळतं“, अशी टीका अमोल मिटकरींनी उत्तम जानकर यांच्यावर केली आहे.
उत्तमरावांनी बारामती मध्ये यावं. अजितदादांच्या या फॉर्म मध्ये ५५ गाईंचा मुक्त गोठा असुन सध्या गायीची देखभाल करायला एका “उत्तम” माणसाची जागा रिक्त आहे. तुमची इच्छा असेल तर सालगडी म्हणुन “उत्तम “काम करता येईल.तसेही तुतारी वाले गोठा साफ करायलाच ठेवणार होते. इथं लायकीचं काम मिळतं. pic.twitter.com/bnCrT6rZmF
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 8, 2024
महत्वाच्या बातम्या-
-पालिकेचा आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा आला समोर; ग्रेडसेपरेटरसाठी खोदलेल्या खड्ड्यात 4 मुली बुडाल्या
-सुनील शेळकेंनी सांगितलं बारणेंचं मताधिक्य कमी होण्याचं नेमकं कारण; म्हणाले…
-पोलीस -वारकऱ्यांमध्ये झालेल्या झटापटीमुळे वारकरी संघटनेचं मोठं पाऊल
-चंद्रकांत पाटलांकडून पावसाळापूर्व कामांचा आढावा; ‘ही’ कामे पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना