बारामती : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. या लढतीमध्ये महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे. या प्रतिष्ठेच्या या लढाईत संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहिले. तर एकटे पाडल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे पहायला मिळाले आहे.
बारामती मतदारसंघातील मतदारांनी सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कौल दिला आहे. या निवडणुकीत सुप्रिया सुळे या लोकसभेत विजयी झाल्यानंतर त्यांनी अजित पवारांना ओपन चॅलेंज दिले आहे. अजित पवारांचे वर्चस्व असलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखान्यातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
संघर्ष करुन जिंकून कारखाना पुन्हा रुळावर आणण्याचा निर्धार त्यांनी कामगारांसमोर व्यक्त केला आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदावरुन अजित पवारांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचा श्रीगणेशा केलेल्या जागेवरुनच निवडणून येण्याचा निर्धार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक काही दिवसांत होत आहे. अशा स्थितीत सप्रिया सुळे यांनी केलेल्या निर्धारानंतर अजित पवारांची काय भूमिका असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पोलीस -वारकऱ्यांमध्ये झालेल्या झटापटीमुळे वारकरी संघटनेचं मोठं पाऊल
-चंद्रकांत पाटलांकडून पावसाळापूर्व कामांचा आढावा; ‘ही’ कामे पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
-अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ बड्या मंत्र्याचे शरद पवार गटात होणार कम बॅक?
-पालिका आयुक्त अॅक्शन मोडमध्ये; या कर्मचाऱ्यांना दिला सज्जड दम, वाचा काय नेमकं प्रकरण