पुणे : राज्यात महाविकास आघाडीला जनतेने कौल दिला असून महायुतीला मोठ फटका बसला आहे. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मराठी आरक्षण आणि आंदोलक मनोज जरांगे पाटील हे महत्वाचा भाग ठरले. मराठवाड्यातील राजकीय परिवर्तन झाल्याचे चित्र बदलल्याचे चित्र पहायला मिळले आहे. मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे मराठवाड्यातील मतदानावर मोठा परिणाम दिसून आला आहे.
लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करुन विजय मिळवला. तसेच अंतरवाली सराटी हे गाव जालना जिल्ह्यात येते आणि याच मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. दानवेंच्या पराभवानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शुक्रवार अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचे पहायला मिळाले आहे. बाबासाहेब पाटील हे आपल्या ५० गाड्यांच्या ताफ्यासह शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन ते अंतरवाली सराटी येथे दाखल झाले होते. यावेळी, आमदार बाबासाहेब पाटील यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यांचा सत्कार केला.
आम्ही तुमच्यासोबत आहोत’, असा शब्दही बाबासाहेब पाटील यांनी जरांगेंना दिला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या या भेटीची चर्चा जोर धरत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांचा चांगलाच असर झाल्याचे पहायला मिळाले आहे. मराठवाड्यातील परभणी आणि बीडमधील महाविकास आघाडीच्या विजयी उमेवारांनी मनोज जरांगेंमुळेच आपला विजय झाल्याचे बोलून दाखवले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे हिट अँन रन: रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला कोणी दिला? धक्कादायक माहिती समोर
-Baramati | विजयानंतर सुप्रिया सुळे अजितदादांंच्या निवासस्थानी; म्हणाल्या…
-‘कोकणात जाऊन काही लोक…’; वसंत मोरेंचा मनसेला खोचक टोला
-कोण होणार पुण्याचा आरटीओ? ‘या’ दोघांच्या नावाची होतेय जोरदार चर्चा
-महाराष्ट्रात प्रथमच महिलांच्या हस्ते लाल महालात ३५० वा शिवराज्याभिषेक दीन साजरा