पुणे : उष्णतेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हैराण झाला आहे. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. कारण राज्यात उष्णतेचा पारा ४५च्या वर गेला होता. अनेक भागात अद्यापही ४०शी पार तापमान असल्याचे आढळून आले आहे. गेले काही महिने कडाक्याच्या उष्णतेने हैराण झालेल्यांना काही भागात दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी ४ जून रोजी तुफान पावसाने हजेरी लावली. शहरात अनेक भागांत कंबरे एवढे पाणी साचले होते.
काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले आहे. हवामान खात्याने पुढील ५ दिवस काही राज्यांमध्ये मुसळधार वादळ आणि पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातून वाहत असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आणि ईशान्य आसामवर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पुढील ५ दिवसांत ईशान्येकडील राज्यांमध्ये हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
येत्या ५दिवसांत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, सौराष्ट्र आणि कच्छ, आंध्रप्रदेशचा किनारी भाग आणि रायलसीमा, तेलंगणा आणि कर्नाटकातही विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५० कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. येत्या १० जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात ६ ते १० जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-काका अजित पवारांपुढे पुतण्या दंड थोपटणार, बारामतीत मोर्चेबांधणीला सुरुवात? युगेंद्र पवार म्हणाले…
-रासनेंनी चॅलेंज पूर्ण केलं.. धंगेकरांचा कसब्यातच करेक्ट कार्यक्रम! नेमकं काय घडलं?
-“दादांना सांगा ताई आली” असं म्हणत शरद पवार गटाने अजितदादांना डिवचलं
-बारामतीच्या पराभवानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय; युगेंद्र पवारांची ‘या’ पदावरुन हटवलं