बारामती : बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी जोमाने भर उन्हात रस्त्यावर उतरुन होते. याच युगेंद्र पवार यांना अजित पवार यांच्या आदेशावरून कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.
सुप्रिया सुळेंची खासदारकी कायम ठेवण्यासाठी, त्यांना विजयी करण्यासाठी युगेंद्र पवार यांनी केलेली कामगिरी पाहता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार युगेंद्र यांचे नाव पुढे करण्याच्या दाट शक्यता आहेत. लोकसभे प्रमाणे विधानसभेलाही बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची चर्चा आहे. या चर्चेवर बोलताना युगेंद्र पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“विधानसभेला पवार विरुद्ध पवार होईल, असे मला वाटत नाही. पण वरिष्ठ निर्णय घेतील. मी छोटा कार्यकर्ता आहे. कोणाला उभा करायचे हे ताई, साहेब, जयंत पाटील ठरवतील. सुप्रिया सुळेंचा विजय झाला. हे कार्यकर्त्यांच्या कष्टाला फळ आले आहे” असे युगेंद्र पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-रासनेंनी चॅलेंज पूर्ण केलं.. धंगेकरांचा कसब्यातच करेक्ट कार्यक्रम! नेमकं काय घडलं?
-“दादांना सांगा ताई आली” असं म्हणत शरद पवार गटाने अजितदादांना डिवचलं
-बारामतीच्या पराभवानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय; युगेंद्र पवारांची ‘या’ पदावरुन हटवलं
-अजित पवार गटाच्या महत्वाच्या बैठकीला अनेक आमदारांची दांडी! शरद पवार गटात परतणार?