सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याचे खासदार म्हणून माजी महापौर मुरलीधर मोहोळ काम करण्याची संधी पुणेकरांनी दिली आहे. लोकसभा निवडणूक निकालात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी 1 लाख २३ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. काँग्रेसला मोठी आशा असणाऱ्या आणि उमेदवार रवींद्र धंगेकर आमदार असलेल्या कसबा मतदारसंघात देखील भाजपने मताधिक्य घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे एक वर्षांपूर्वी पोटनिवडणुकीत मिळवलेले मताधिक्य देखील धंगेकर यांना राखता आले नाही.
यंदा पुणे लोकसभेची निवडणूक ही अनेक मुद्द्यांमुळे लक्ष्यवेधी बनली. राजकीय आरोप-प्रत्यारोप, उमेदवारीसाठी अनेकांची सुरु असणारी धडपड, विकासाचे व्हिजन यासह अत्यंत महत्वाचा आणि लक्ष्यवेधी मुद्दा हा कसब्यात भाजप कशी कामगिरी करणार हा देखील होता. पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा झालेला पराभव चर्चेचा विषय बनला, परंतु पराभवाचा वचपा काढत भाजपने कसबा मतदारसंघात विक्रमी १५ हजारांचे मताधिक्य मिळवले आहे. यामध्ये स्वतः धंगेकर नगरसेवक राहिलेल्या प्रभागात त्यांना फटका बसला, तर हेमंत रासने यांच्या प्रभाग १५ मधून १७ हजार आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रभागातून 630 मतांचा लीड मोहोळ यांना मिळाला आहे.
भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासह कसब्याचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी संपूर्ण लोकसभा निवडणुकीत आपण कसब्यात मताधिक्य घेऊ हा विश्वास व्यक्त केला होता. येथे पोटनिवडणुकीतील पराभवाने न खचता रासने यांनी मतदारसंघात उभी केलेली कार्यकर्त्यांची फौज, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी असणारा मतदारांचा पाठिंबा मोहोळ यांच्या कामाला आल्याचं दिसत आहे.
पोटनिवडणुकीनंतर हेमंत रासने यांच्यावर विश्वास टाकत भाजपच्या श्रेष्ठींनी त्यांना कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांची फळी उभी करत संघटना मजबूत करण्यावर भर दिला. महिला आघाडी , युवा मोर्चा, व्यापारी आघाडी असो किंवा इतर कोणत्याही आघाड्या असोत सर्वांना सोबत घेत कसब्यातील नागरिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यावर त्यांनी भर दिला.
कसबा विधानसभा मतदारसंघात अनेक प्रलंबित कामे जी आमदार असताना देखील धंगेकर यांना मार्गी लावता आली नाहीत ती कामे रासने यांनी पाठपुरावा करून मार्गी लावली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनेक विकासकामांना उपलब्ध करून दिलेला निधी भाजपसाठी जमेची बाजू ठरलं आहे. भाजपला कसब्यात मिळालेले मताधिक्य ही विरोधकांसाठी धोक्याची घंटा असून आगामी विधानसभा निवडणुकीत हीच परिस्थिती राहिल्यास काँग्रेसला डोकेदुखी ठरू शकते.
महत्वाच्या बातम्या-
-“दादांना सांगा ताई आली” असं म्हणत शरद पवार गटाने अजितदादांना डिवचलं
-बारामतीच्या पराभवानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय; युगेंद्र पवारांची ‘या’ पदावरुन हटवलं
-अजित पवार गटाच्या महत्वाच्या बैठकीला अनेक आमदारांची दांडी! शरद पवार गटात परतणार?
-…म्हणूनच आढळराव पाटलांना शिरुरमध्ये पराभव झाला? भोसरीमधून ९ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य तरीही हार