पुणे : देशातील लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चांगलेच यश मिळवले आहे. या लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला भरभरून मते दिली आहेत. महायुतीला राज्यात मोठा धक्का बसला आहे. या लोकसभेत महायुतीमध्ये असलेल्या अजितत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अवघी एक जागा मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटाने आज मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे.
महायुतीला राज्यात अनेक जागांवर मोठा धक्का बसला आहे. अशातच महायुतीतील अजित पवार गटाने एकच जागा पटकावली आहे. त्यामुळे अनेकजण पक्षावर नाराज आहेत. त्यामुळेच अजित पवारांच्या या बैठकीला अनेक आमदारांनी पाठ फिरवण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आले मात्र, आज या बैठकीला अजित पवार गटाचे अनेक आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अजित पवार गटाला मिळालेल्या अपयशानंतर पक्षावर नाराज असलेले अनेक नेते शरद पवार गटाच्या नेते मंत्र्यांशी गाठीभेटी घेणार असल्याच्या चर्चा आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या गाठीभेटी घेणार असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणूनच आढळराव पाटलांना शिरुरमध्ये पराभव झाला? भोसरीमधून ९ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य तरीही हार
-अजित पवारांना एकच जागा; शरद पवार म्हणाले, ‘त्यांच्या राष्ट्रवादीचे भविष्य…’
-महाराष्ट्रात एनडीएला फटका का बसला? केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, ‘अजित पवार आमच्यासोबत…’
-मोहोळांनी गुलाल उधळला मात्र भाजपचे दोन आमदार ‘डेंजर झोन’मध्ये, गणित नेमकं कुठं फसलं?