पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघामध्ये भाजपला शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचेच आमदार असूनही सर्वात कमी मताधिक्य मिळाले आहे. याचा परिणाम येत्या विधानसभेमध्ये होण्याची शक्यता आहे. याची दखल आता भाजपच्या वरिष्ठांनी घेतली आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांनी गांभीर्याने काम केले नसल्याचे मताधिक्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील पराभूत झालेल्या जांगा आणि विजय मिळवलेल्या जांगामध्ये कमी मताधिक्य असाणाऱ्या भागाचा आढावा घेण्यात आला.
आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट देताना या लोकसभा निवडणुकीत संबंधित मतदाराने मिळवून दिलेले मताधिक्य हा निकष लावणार असल्याचे भाजपने यापूर्वीच जाहीर केले आहे. यामुळे पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे आणि शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कांबळे आणि शिरोळे यांची धाकधूक वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्रात एनडीएला फटका का बसला? केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, ‘अजित पवार आमच्यासोबत…’
-मोहोळांनी गुलाल उधळला मात्र भाजपचे दोन आमदार ‘डेंजर झोन’मध्ये, गणित नेमकं कुठं फसलं?
-मुळशीचा स्वाभिमान, अभिमान पुणेकरांनी दिल्लीला पाठवला; मोहोळांच्या विजयावर मित्राची प्रतिक्रिया
-पुणे जिल्ह्यात महाविकास-महायुतीमध्ये टाय; प्रत्येकी 2 जागांवर उमेदवार विजयी
-सोशल मीडियावर अजित पवारांचा ट्रेंड; ‘ते’ व्हिडीओ शेअर करत नेटकरी विचारतात,’आता मिशी…’