पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार भाजपचे मुरलीधर मोहोळ हे अधिकचे मताधिक्य घेत निवडून आले आहेत. पुणे शहरात भाजप समर्थकांनी शहरात जल्लोष केला. मुरलीधर मोहोळ यांच्या विजयानंतर त्यांचे मित्र मराठी अभिनेते प्रवीण तरडे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
“माझा मित्र, जिवाभावाचा भाऊ खासदार झाला. त्यामुळे खूप आनंदाचा क्षण आहे. मुळशीचा अभिमान, स्वाभिमान पुणेकरांनी दिल्लीला पाठवला आहे. निसर्गही आनंद झाला असून आकाशातून आनंदाश्रू वाहत आहेत. हे खरंतर गिरीश बापट यांचेच आनंदाश्रू आहेत. आज त्यांची आठवण येत आहे”, असे प्रवीण तरडे म्हणाले आहेत.
“आमच्या मैत्रीचा पॅटर्न अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आमचे काही मित्र लेखक, कलाकार, दिग्दर्शक होते. काही जण इव्हेंटमध्ये आहेत. या मैत्रीच्या पॅटर्नमध्ये खासदार कमी होता. तो पुणेकरांनी बनवला आणि दिल्लीला पाठवला. मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने सुशिक्षित, सालस, शांत स्वभावाचा त्याच्या बोलण्यात कुठेही आगपाखड नसते”, असे प्रवीण तरडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे जिल्ह्यात महाविकास-महायुतीमध्ये टाय; प्रत्येकी 2 जागांवर उमेदवार विजयी
-सोशल मीडियावर अजित पवारांचा ट्रेंड; ‘ते’ व्हिडीओ शेअर करत नेटकरी विचारतात,’आता मिशी…’
-Maval : बारणेंनी मावळची जागा राखली; किती मतांनी मिळवला विजय?
-सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांच ‘ते’ ट्वीट चर्चेत; अजित पवारांना म्हणाले, ‘बच्चा…’
-#BaramatiResult | ‘गुलाल आपलाच’ म्हणणारे सुनेत्रा पवारांचे बॅनर हटवले