पुणे : महाराष्ट्रात ४८ जागांवर झालेल्या लोकसभा निवडणुकीचा काल ४ जून रोजी निकाल जाहीर झाला. अनेकांचे खासदार होण्याचे स्वप्न भंगले आहे. तर अनेक उमेदवारांची आशा नसतानाही त्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला १३ जागा मिळाल्या आहेत. तर सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपला अवघ्या ९ जागांवर विजय मिळाला आहे.
भाजपचे वारे वाहत असूनही काँग्रेसला १३ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला महाराष्ट्रात १० पैकी ८ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला एकून ९ जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा, अपक्ष १ आणि शिंदेंच्या शिवसेनेला ७ जागांवर विजय मिळाला आहे. राज्यात अशा ४८ जागांपैकी महायुतीला एकूण १७ जागांवर समाधान मानावे लागले असून महाविकास आघाडीने ३० जागा मिळवत दमदार यश मिळवले आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला २ आणि महायुतीला २ अशा जागांवर यश मिळाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे भाजपचे मुरलीधर मोहोळ तर मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे विजयी झाले असून महायुतीला या २ जागांवर यश मिळाले आहे.
बारामती आणि शिरुर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होता. या दोन्ही जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. महाविकास आघाडीच्या बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि शिरुरमधून अमोल कोल्हे यांनी विजय मिळवत महाविकास आघाडीच्या यशात २ जागांची भर पाडली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सोशल मीडियावर अजित पवारांचा ट्रेंड; ‘ते’ व्हिडीओ शेअर करत नेटकरी विचारतात,’आता मिशी…’
-Maval : बारणेंनी मावळची जागा राखली; किती मतांनी मिळवला विजय?
-सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांच ‘ते’ ट्वीट चर्चेत; अजित पवारांना म्हणाले, ‘बच्चा…’
-#BaramatiResult | ‘गुलाल आपलाच’ म्हणणारे सुनेत्रा पवारांचे बॅनर हटवले