बारामती : देशातील निकाल आज जाहीर होत आहे. अनेक मतदारसंघाचे निकाल हाती आले आहेत. राज्यात हाय हायहोल्ट मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे पुन्हा एकदा खासदार म्हणून बारामतीमधून निवडणून आल्या आहेत. सुप्रिया सुळेंनी बारामतीची जागा यंदाही राखून ठेवल्याचे पहायला मिळाले आहे.
यंदा फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्यात अनेक जागांवरील लढतींमध्ये नवे राजकारण पहायला मिळाले आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आमनेसामने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. तरीही अजित पवार विरुद्ध शरद पवार असा थेट सामना या निवडणुकीच्या माध्यमातून पहायला मिळाला आहे.
बारामतीकरांचे अजित पवारांवर कितीही प्रेम असले तरीही बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व नाकारले आहे. २ दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले होते. ते आज निवडणूक निकालानंतर हटवण्यास सुरवात केली आहे. मतमोजणी आज सकाळ ७ वाजल्यापासून सुरू झाली असून अजित पवारांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांचे बॅनर निकलापूर्वीच लावण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता निकालानंतर सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर हे बॅनर उतरवण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांना काकांविरोधात बंड भोवले; बारामतीत सुप्रिया सुळेंचा १ लाखापेक्षा जास्त लीडने विजय
-पैलवानानं मैदान मारलं: पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ; धंगेकरांचा दारुण पराभव
-‘काय म्हणता पुणेकर निवडून आलाय मुरलीधर’; थेट काँग्रेस भवनाच्या दारावर पोस्टर लावत धंगेकरांना डिवचलं
-मोहोळांची गाडी सुसाट: बाराव्या फेरीतही घेतली इतक्या मतांची आघाडी