पुणे : राज्यातील महत्वाची असणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्यात हा सामना रंगला होता. मोहोळांनी काँग्रेसच्या धंगेकरांचा दारुण पराभव केला आहे.
पुणे निवडणुकीचा सामना सर्वाधिक चुरशीचा झाल्याचे पहायला मिळाले. भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आमने सामने आले होते. पुण्यात एकूण 53.54 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यात 20,61,276 मतदारांपैकी 11,03,678 पुणेकरांनी मतदान केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘काय म्हणता पुणेकर निवडून आलाय मुरलीधर’; थेट काँग्रेस भवनाच्या दारावर पोस्टर लावत धंगेकरांना डिवचलं
-मोहोळांची गाडी सुसाट: बाराव्या फेरीतही घेतली इतक्या मतांची आघाडी
-Pune | मुरलीधर मोहोळांचा पुन्हा आघाडी; किती मतांनी घेतली आघाडी?
-बारामतीत पवारांच्या प्रतिष्ठेची लढाई, नवव्या फेरीत सुप्रिया सुळेंचा लीड किती? पहा Live
-पुण्यात भाजपची आघाडी कायम; मोहोळ-धंगेकरांना मिळालेल्या मतांची आकडेवारी वाचा एका क्लीकवर