पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीच्या मतांची मोजणी सुरु आहे. अतिशय चुरशीची अशी लढाई रंगली होती. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यात हा सामना रंगला होता. अशातच मुरलीधर मोहोळ हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. प्रचारावेळी दोन्ही उमेदवारांची एकमेकांवर टीका टिपण्णी झाली होती. धंगेकरांच्या घोषणा करताना नाऱ्याची चांगलीच चर्चा रंगली.
‘काय म्हणता पुणेकर निवडणून येणार धंगेकर’ असा नारा धंगेकरांच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. आता याच नाऱ्यावरुन धंगेकरांना मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांनी डिवचलं आहे. थेट काँग्रेस भवनच्या गेटवर हे बॅनर लावले आहेत. मोहोळ आघाडीवर असल्याने मोहोळांच्या कार्यकर्त्यांनी थेट काय म्हणता पुणेकर निवडून आलाय मुरलीधर, असं बॅनर लावून धंगेकरांना डिवचले आहे.
मुरलीधर मोहोळ यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मोहोळ हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर असून त्यांनी ही आघाडी कायम ठेवली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोहोळांची गाडी सुसाट: बाराव्या फेरीतही घेतली इतक्या मतांची आघाडी
-Pune | मुरलीधर मोहोळांचा पुन्हा आघाडी; किती मतांनी घेतली आघाडी?
-बारामतीत पवारांच्या प्रतिष्ठेची लढाई, नवव्या फेरीत सुप्रिया सुळेंचा लीड किती? पहा Live
-पुण्यात भाजपची आघाडी कायम; मोहोळ-धंगेकरांना मिळालेल्या मतांची आकडेवारी वाचा एका क्लीकवर
-Lok Sabha Result : मावळमध्ये महायुतीचं पारडं जड; बारणेंनी किती मतांनी घेतली आघाडी?