बारामती : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असणाऱ्या राज्यातील बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या निवडणुकीत पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यामुळे नणंद-भावजईच्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या सुरुवातीपासूनच आघाडीवर असल्याचे दिसत आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. नवव्या फेरीच्या शेवटी सुप्रिया सुळे ३५ हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी संपूर्ण ताकद लावली होती. बारामतीमधील मतदारांना भावनिक सादही घालण्यात आली होती. आज मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुनेत्रा पवार या सुरुवातीपासून पिछाडीवर असल्याचे दिसून आले आहे. बारामतीमधील मतदारांनी अजित पवार यांची साथ न देता शरद पवार यांच्या सोबत राहणेच पसंत केल्याचे चित्र आतापर्यंत दिसले आहे.
विशेष म्हणजे अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह हे दोन्ही सोबत घेतले. मात्र तरीही अजित पवार लोकांच्या मनात आपली जागा कायम राखून ठेवू शकले नसल्याचे दिसत आहे. याउलट सुप्रिया सुळे यांनी नव्या पक्षाचे नाव तसेच नवे निवडणूक चिन्ह सोबत घेऊन मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आणि तो आज कुठे तरी यशस्वी होण्याच्या वाटेवर आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात भाजपची आघाडी कायम; मोहोळ-धंगेकरांना मिळालेल्या मतांची आकडेवारी वाचा एका क्लीकवर
-Lok Sabha Result : मावळमध्ये महायुतीचं पारडं जड; बारणेंनी किती मतांनी घेतली आघाडी?
-Baramati | बारामतीच्या लेकीचं पारडं झालं जड; सुनेला टाकलं मागे
-मुरलीधर मोहोळ सलग चौथ्या फेरीतही आघाडीवर; वाचा मोहोळ- धंगेकरांना मिळालेली मतांची आकडेवारी
-शिरुर लढतीमध्ये आढळराव पाटील की अमोल कोल्हे आघाडीवर? कोणाला किती मते पहा Live