बारामती : अवघ्या राज्यातील लक्षवेधी ठरलेली निवडणूक म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक. या हाय व्होल्टेज निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून कोण विजयी होणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचत आहे. सध्या देशातील निवडणुकांच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. काही तासातच कोणाची सत्ता येणार? हे चित्र स्पष्ट होणार आहे.
मतमोजणी दरम्यान बारामती मतदारसंघातून बारामतीची लेक सुप्रिया सुळे याच आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळात आहे. सुप्रिया सुळे या सलग चौथ्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे या चौथ्या फेरीतही तब्बल 19000 मतांनी आघाडीवर आहेत, तर सुनेत्रा पवार या पिक्चर पिछाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मला बोलता येत नाही.
बारामती मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रिया सुळे तर महायुतीकडून अजित पवार गटाकडून अशी नणंद भाऊजाईची लढाई चांगलीच रंगली होती. बारामतीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. त्यामुळे या या निवडणुकीत बारामतीकर कोड्यात पडले होते नेमका कौल कोणाला द्यावा बारामतीच्या लेकीला की की सुनेला?
महत्वाच्या बातम्या-
-मुरलीधर मोहोळ सलग चौथ्या फेरीतही आघाडीवर; वाचा मोहोळ- धंगेकरांना मिळालेली मतांची आकडेवारी
-शिरुर लढतीमध्ये आढळराव पाटील की अमोल कोल्हे आघाडीवर? कोणाला किती मते पहा Live
-मावळमध्ये बारणे का वाघेरे आघाडीवर? पहा Live कोणाला किती मते?
-सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळेंमध्ये काटे की टक्कर? तिसऱ्या फेरी अखेर कोणाची आघाडी? पहा live
-दुसऱ्या फेरी अखेर पुण्यात मोहोळ आघाडीवर, पहा कोणाला किती मते