Urfi Javed : सध्या सोशल मीडियावर नेहमीच फॅशनचे नवनविन ट्रेंड्स येत असतात. त्यातच अतिशय युनिक फॅशनचा ट्रेंड उलगडणारी आणि नेहमीच आपल्या फॅशनने सोशल मीडियावर चर्चेत राहणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फी जावेदने नुकतीच सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे.
उर्फीने केलेल्या बोटॉक्स आणि फिलवरून तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. पण, उर्फीला काही अशा अॅलर्जीज आहेत, ज्या दर २ दिवसांनी तिच्या चेहर्यावर होतात. याबाबत आता स्वत: उर्फीने खुलासा केला आहे. उर्फीने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये उर्फीचा चेहरा सुजलेला दिसत आहे.
“इम्युनोथेरपी चालू आहेृ, पण जर तुम्ही मला अशा सुजलेल्या चेहऱ्यामध्ये पाहिलंत तर तुम्ही समजून जा की मला अॅलर्जी झाली आहे. मी माझ्या नेहमीच्या फिलर आणि बोटॉक्सशिवाय काहीही केले नाही, जे मी १८ वर्षांची असल्यापासून करत आहे. जर तुम्हाला माझा चेहरा सुजलेला दिसत असेल तर मी फिलर्स वगैरे नको करायला असे सल्ले देऊ नका, मला फक्त सहानुभूती दाखवा आणि पुढे जा”, असे उर्फी म्हणाली आहे.
View this post on Instagram
उर्फीने शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देत उर्फी म्हणाली, “मला लोकांकडून अशा प्रतिक्रिया मिळत आहेत की फिलर्समुळे माझा चेहरा जरा जास्तच सुजला आहे. मला खूप ॲलर्जी आहे, माझा चेहरा बहुतेक वेळा सुजलेला असतो. मी दर दुसऱ्या दिवशी अशीच उठते आणि माझा चेहरा नेहमी सुजलेला असतो, यामुळे मी नेहमी अस्वस्थ असते. हे फिलर्स नाही आहेत, या अॅलर्जीज आहेत” असे उर्फी म्हणाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-इतिहास घडणार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार! पुण्यात रासनेंकडून ३७० किलो पेढे वाटप
-अदा शर्माने सुशांत सिंह राजपूतचे ‘ते’ घर घेतले विकत; म्हणाली, ‘मला या घरात….’
-”त्या’ पराभवाची चीड माझ्या मनात निश्चितच, अजितदादांशी माझं बोलणं…’- संजोग वाघेरे
-संपूर्ण देशाचं लक्ष बारामती निकालाकडे; सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार बारामतीच्या खासदार?
-अरुण गवळीच्या सुटकेनंतर राजकीय पक्षांची साद; शिंदे-फडणवीस लागले तयारीला