शिरुर : राज्यात लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्प्यातील मतदान पार पडले त्यानंतर राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. अशातच अनेक माध्यम संस्थांनी आपापले एक्झिट पोल वर्तवले आहे. यावरुन राज्यात कोणाची सत्ता येणार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चा असणाऱ्या मतदारसंघापैकी एक म्हणजे शिरुर लोकसभेची निवडणूक. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटातून अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात ही मुख्य लढत झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीतही कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी लढत झाली होती आणि अमोल कोल्हे हे आढळराव पाटलांचा पराभव करत जायंट किलर ठरले होते.
यंदाच्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. मतदारसंघात फिरले नसल्याचंही बोललं गेलं. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या, शहरीकरण, बेरोजगारी आणि विकास हे मुलभूत मुद्दे शिरुरच्या प्रचाराचा मुख्य भाग होते. शिरुरची जागा महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवारांसाठी राखण्यात आली होती. अजित पवारांकडे अमोल कोल्हे यांच्या विरोधात तोलामोलाचा उमेदवार नसल्यामुळे आणि शिवसेनेमध्ये (शिंदे गट) असताना शिवाजीराव आढळराव शिरुरच्या जागेसाठी आग्रही होते. त्यामुळे लोकसभेच्या उमेदवारीसाठी आढळराव पाटील यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपकडून आढळराव पाटलांच्या पारड्यात कशाप्रकारे व्होट ट्रान्स्फरिंग होते, यावर बरीच गणितं अवलंबून आहेत.
अनेक एक्झिट पोलनुसार आढळराव पाटील हे पिछाडीवर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अमोल कोल्हे हे पुन्हा एकदा आढळराव पाटलांचा पराभव करणार की आढळराव पाटील हे मागील निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढणार हे येत्या निकालावरुन स्पष्ट होणार आहे. शिरुर लोकसभा निवडणुकीच्या २०१९च्या तुलनेत यंदा शिरुरमध्ये मतदानाचा टक्का किंचित घटला. निवडणूक आयोगाच्या अंतिम आकडेवारीनुसार शिरुरमध्ये ५४.१६ टक्के मतदान झाले. शिरुरच्या सर्व ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा कमी मतदान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शनिवारवाड्यात बाॅम्बची अफवा पसरविणाऱ्या बीडमधील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
-पुणे पोलिसांना झालंय तरी काय? नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाकडून करुन चक्क पाय चेपून घेतले
-शिरुरचा खासदार कोण? एक्झिट पोलनुसार आढळराव पाटील की अमोल कोल्हे मारणार बाजी
-मावळचा खासदार कोण होणार? सर्व एक्झिट पोलमध्ये आलं एकच नाव; वाचा कोणाच्या गळ्यात विजयाची माळ
-पुण्यात मोहोळ धंगेकर अन् मोरेंमध्ये काटे की टक्कर, कोण होणार खासदार? एक्झिट पोलमध्ये मोहोळांची बाजी