पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणाराची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. या संपूर्ण घटनेमध्ये रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. थक्क करणारं वास्तव समोर येत आहे. अशातच या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात अनेक भागात मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करणे सुरु आहे. तसेच कल्याणीनगर भागात पुणे पोलिसांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे.
नाकाबंदी केलेल्या भागात काही तरुणांची गाडी अडवली आणि पोलिसांनी चक्क तरुणाला पाय दाबण्यास सांगितले आहे. पोलीस अधिकाऱ्यांने युवकाकडून पाय दाबून घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांच्या भीतीने युवकाने त्यांचे पाय दाबले, आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून पोलिसांची मुजोरी करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
काही तरुण रात्री १२ वाजताच्या सुमारास कल्याणीनगर भागातून कारने प्रवास करताना पोलिसांनी त्यांना नाकाबंदी दरम्यान अडवले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून दंड आकारला तसेच या कारमधील एका युवकाकडून पोलीस अधिकाऱ्याने पाय दाबून घेतल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिरुरचा खासदार कोण? एक्झिट पोलनुसार आढळराव पाटील की अमोल कोल्हे मारणार बाजी
-मावळचा खासदार कोण होणार? सर्व एक्झिट पोलमध्ये आलं एकच नाव; वाचा कोणाच्या गळ्यात विजयाची माळ
-पुण्यात मोहोळ धंगेकर अन् मोरेंमध्ये काटे की टक्कर, कोण होणार खासदार? एक्झिट पोलमध्ये मोहोळांची बाजी
-Baramati | एक्झिट पोलनुसार बारामतीत कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?
-ब्रेकिंग: लोकसभेचा एक्झिट पोल आला, बारामतीत काका की पुतण्या? पहा काय आहे लोकांचा कल