शिरुर : शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाप्रमाणे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला होता. शिरुर लोकसभेसाठी शिवसेनेच्या शिंदे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे यांच्यात पुन्हा एकदा लढत झाल्याचे पहायला मिळाले.
शिरुर लोकसभा निवडणुकीमध्ये कोण आघाडीवर कोण पिछाडीवर हे पाहण्यासाठी टीव्ही९ मराठी या माध्यम संस्थेच्या एक्झिट पोल दर्शवला आहे. त्यातच टीव्ही९ पोलस्ट्रोटनुसार शिरुर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे आघाडीवर तर शिवाजीराव आढळराव पाटील हे पिछाडीवर असल्याचे दर्शवण्यात आले आहे.
शिरुर लोकसभेची निवडणूक देखील अतिशय चुरशीची झाली. शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात ही दुसरी निवडणुक झाली आहे. यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना झाला अन् कोल्हे आणि आढळराव पाटील आमने सामने आले होते. त्यानंतर आता राजकीय समीकरणं बदलली आणि पुन्हा हे दोन्ही नेते आमनेसामने आल्याचे या निवडणुकीत पहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळचा खासदार कोण होणार? सर्व एक्झिट पोलमध्ये आलं एकच नाव; वाचा कोणाच्या गळ्यात विजयाची माळ
-पुण्यात मोहोळ धंगेकर अन् मोरेंमध्ये काटे की टक्कर, कोण होणार खासदार? एक्झिट पोलमध्ये मोहोळांची बाजी
-Baramati | एक्झिट पोलनुसार बारामतीत कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?
-ब्रेकिंग: लोकसभेचा एक्झिट पोल आला, बारामतीत काका की पुतण्या? पहा काय आहे लोकांचा कल
-निकालापूर्वीच मतदारसंघात विजयाचे बॅनर; इंदापूरात सुप्रिया सुळेंचे तर फलटणमध्ये निंबाळकरांचे बॅनर