मावळ : मावळ मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हावर न लढता ठाकरे गटाचे नवे चिन्ह मशाल या चिन्हावर निवडणूक लढली आहे. यामुळे ठाकरे गटावर या निवडणुकीत याचे काय परिणाम होणार हे निवडणूक निकालातून समोर येईलच.
मावळमध्ये शिंदे गटाकडू विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांच्यात मुख्य लढत झाली. मात्र, टीव्ही९ मराठी या माध्यम संस्थेचा एक्झिट पोलनुसार शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे आघाडीवर आहेत आणि ठाकरे गटाचे वाघेरे हे पिछाडीवर आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मावळ मतदारसंघामध्ये रोड शो केला होता. तसेच श्रीरंग बारणे यांनी मावळचा जागा राखली असल्याचे एक्झिट पोलवरुन समोर आले आहे. श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी, भाजपकडून म्हणजेच महायुतीतील पक्षांकडूनच प्रचंड विरोध करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात मोहोळ धंगेकर अन् मोरेंमध्ये काटे की टक्कर, कोण होणार खासदार? एक्झिट पोलमध्ये मोहोळांची बाजी
-Baramati | एक्झिट पोलनुसार बारामतीत कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?
-ब्रेकिंग: लोकसभेचा एक्झिट पोल आला, बारामतीत काका की पुतण्या? पहा काय आहे लोकांचा कल
-निकालापूर्वीच मतदारसंघात विजयाचे बॅनर; इंदापूरात सुप्रिया सुळेंचे तर फलटणमध्ये निंबाळकरांचे बॅनर
-Skin Care Tips | मलायका सारखी सुंदर स्कीन हवीय, तर मग आजच बनवा ‘हे’ सोपे फेसपॅक