बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक झाली आहे. महाविकास आघाडीकडून बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली आहे.
संपूर्ण देशाचे या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे. त्यापूर्वी विविध माध्यम संस्थांचे एक्झिट पोल समोर येत आहेत. त्यातच आता बारामती लोकसभेचा टीव्ही 9 पोलस्ट्रेटनुसार बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या आघाडीवर तर अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार या पिछाडीवर असल्याचे वर्तवण्यात आले आहे.
अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्यासाठी बारामतीची लोकसभा लढत अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीत भावनिक होऊन मत देऊ नका या मुद्द्यावरुन मुख्यत्वे प्रचार करण्यात आला. मात्र या एक्झिट पोलनुसार सुनेत्रा पवार या पिछाडीवर असून सुप्रिया सुळे या आघाडीवर दिसत आहेत. मात्र, जनतेचा कौल कोणाला हे येत्या निवडणूक निकालातून स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ब्रेकिंग: लोकसभेचा एक्झिट पोल आला, बारामतीत काका की पुतण्या? पहा काय आहे लोकांचा कल
-निकालापूर्वीच मतदारसंघात विजयाचे बॅनर; इंदापूरात सुप्रिया सुळेंचे तर फलटणमध्ये निंबाळकरांचे बॅनर
-Skin Care Tips | मलायका सारखी सुंदर स्कीन हवीय, तर मग आजच बनवा ‘हे’ सोपे फेसपॅक
-आरोपीची आई शिवानी अग्रवालकडूनही उडवाउडवीची उत्तरं; उद्या न्यायालयात करणार हजर
-‘येत्या ७ दिवसात दुधाचे दर वाढवा अन्यथा…’; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा