पुणे : देशात गेल्या दीड महिन्यांपासून ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. आज सातव्य टप्प्यातील मतदान सुरु असून आता फक्त प्रतिक्षा आहे ती निकालाची. या निवडणूक निकालापूर्वी वेगवेगळ्या माध्यम संस्थांचे एक्झिट पोल समोर येत आहेत. या संस्थांच्या एक्झिट पोलनुसार कोण बाजी मारणार? कोणाला पराभव पत्करावा लागणार याबाबतचा अंदाज येईल. टीव्ही 9 पोलस्ट्रेटच्या आकडेवारीनुसार, उपुमख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्रात एकूण ४ जागांवर निवडणूक झाली. यापैकी पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक झाली आहे. मात्र, टिव्ही९ मराठीच्या एक्झिट पोलनुसार अजित पवारांच्या हातून शिरुर आणि बारामतीच्या जागा हातून गेल्याचे दर्शवण्यात येत आहे.
बारामतीमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढली आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या मैदानात होत्या. तसेच शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद पवार गटाकडून खासदार अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-निकालापूर्वीच मतदारसंघात विजयाचे बॅनर; इंदापूरात सुप्रिया सुळेंचे तर फलटणमध्ये निंबाळकरांचे बॅनर
-Skin Care Tips | मलायका सारखी सुंदर स्कीन हवीय, तर मग आजच बनवा ‘हे’ सोपे फेसपॅक
-आरोपीची आई शिवानी अग्रवालकडूनही उडवाउडवीची उत्तरं; उद्या न्यायालयात करणार हजर
-‘येत्या ७ दिवसात दुधाचे दर वाढवा अन्यथा…’; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा