Skin Care Tips : सध्याच्या धूळ, माती, प्रदूषणामुळे आपल्या त्वचेची काळजी घेतली तरीही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याचदा काळे डाग, सुरकुत्या, पिंपल्स्, पिंपल्सचे डाग चेहऱ्यावर दिसून येतात. चेहऱ्यावरील डागांमुळे, निस्तेजपणामुळे त्रस्त असाल तर काही टिप्स फॉलो करा नक्कीच फरक दिसून येईल.
हवामानानुसार आपल्या त्वचेमध्ये फरक जाणवू लागतो. उन्हाळा, पावसाळा तसेच हिवाळ्यात त्वचेच्या विविध अनेक समस्या जाणवू लागतात. अशा स्थितीमध्ये काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाला असे वाटते, की आपली स्किन ही ग्लोइंग, नितळ आणि चमकदार दिसावी. मात्र, धावपळीच्या दिवसात स्किनची योग्य काळजी घेणे अनेकदा शक्य होत नाही.
तांदळाच्या पीठाचा फेसपॅक
आपल्या त्वचेवर ग्लो येण्यासाठी तांदूळाच्या पीठात गुलाबपाणी मिसळून याचा फेस पॅक तयार करा. त्यासाठी एका वाटीत २ चमचे तांदूळाचे पीठ घ्या. त्यात गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा मसाज करा आणि काही वेळ सुकण्यासाठी सोडून द्या. नंतर नॉर्मल पाण्याचे चेहरा स्वच्छ धुवावा. काही दिवसांमध्ये फरक जाणवेल.
फळांचे स्क्रब
केळी, किव्ही, पपई किंवा संत्री तुम्हाला बाजारात लगेचच मिळतील. या फळांच्या मदतीने स्क्रब तयार करणं खूपच सोपं आहे. पपई, केळी, संत्री आणि किव्हीचे साल तुम्ही स्क्रब म्हणून वापरू शकता किंवा पावडर बनवून दूध आणि दह्याबरोबर एकजीव करून हे स्क्रब तयार करुन चेहऱ्याला लावू शकता. यामुळेही चेहऱ्याला नितळपणा येतो किंवा टिकून राहतो.
आळशीच्या बिया अन् तांदळ्याच्या पीठाचा फेसपॅक
ग्लासभर उकळलेल्या पाण्यात २ चमचे आळशीच्या बिया, १-२ चमचे तांदूळाचे पीठ घालून हे मित्रण चांगले एकत्रित करा. १० मिनिटे शिजवून घेतल्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर हे चेहऱ्याला लावल्याने चेहरा चांगला चमकू लागेल आणि हरवलेले सौंदर्य परत येण्यास मदत होईल.
मुलतानी मातीचा फेसपॅक
आळशी रात्रभर पाण्यात भिजवायला ठेवा. त्यानंतर सकाळी मुलतानी पाणी, गुलाब पाण्याबरोबर मिसळून एक फेस पॅक तयार करुन हा फेसपॅक चेहऱ्याला १५ मिनिटे लावून सोडून द्या. ग्लोईंग स्किनसाठी आठवड्याभरातून एकदा हा फेस मास्क नक्कीच चेहऱ्याला लावायचा. काही वेळातच फरक जाणवू लागेल.
महत्वाच्या बातम्या-
-आरोपीची आई शिवानी अग्रवालकडूनही उडवाउडवीची उत्तरं; उद्या न्यायालयात करणार हजर
-‘येत्या ७ दिवसात दुधाचे दर वाढवा अन्यथा…’; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा