पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी अनेक प्रयत्न केले असल्याचे हळूहळू उघडकीस येत आहे. या प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले. यावरुन ससूनमधील २ डॉक्टरांना ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान आरोपीच्या आईने डॉक्टरांना मदत केली असल्याचे समोर आले आहेत. यावरुन आई शिवानी अग्रवालला सकाळी पुणे पोलिसांनी अटक केली.
विशाल अग्रवालला याआधीच अटक करण्यात आली आहे. विशाल अग्रवालला तुरुंगातून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यानंतर शिवानी अग्रवालला अटक केली असून उद्या म्हणजेच २ जूनला आई-वडिलांना सोबतच न्यायालयात हजर केले जाणार आहे. शिवानी अग्रवालची चौकशी करण्यात आली. या चौकशीत आईकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
रक्त नमुने बदलणे, पुरावे नष्ट करणे, कट रचणे आणि इतर घटनाक्रमामध्ये शिवानी अग्रवाल यांचा सहभाग तपासण्यात येणार आहे. सबळ पुरावे हाती लागल्यावरच कारवाई सुरु करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी देखील अल्पवयीन मुलाचे आजोबा आणि वडील विशाल अग्रवाल हे चौकशीत सहकार्य करत नाही, असे पुणे पोलिसांनी सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘येत्या ७ दिवसात दुधाचे दर वाढवा अन्यथा…’; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
-Pune | शनिवार वाड्याजवळ बेवारस बॅग, परिसरात उडाली खळबळ
-कालिचरण महाराजांना ‘ते’ वक्तव्य पडणार महागात; राज्य महिला आयोगाचं नाशिक पोलिसांना पत्र