पुणे : पुणे शहरात राज्यातील तसेच इतर राज्यातून मुले-मुली शिक्षणासाठी येत असतात. त्यातच घरापासून लांब राहणारे एन्जॉय म्हणून नाईट लाईफ किंवा अंमली पदार्थ तसेच दारुच्या आहारी जातात. अशा सवयींमधून अनेक अनुचित प्रकार घडतात. त्यातच कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातामध्ये २ तरुणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात नोकरीसाठी असलेल्या मुलांच्या पालकांनी या अपघात प्रकरणाचा चांगलाच धसका घेतला असून सर्व पालकही आता सतर्क झाले आहेत.
महाराष्ट्रासह देशातील १०० हून अधिक पालकांनी गेल्या आठवड्यात आपल्या मुलावर लक्ष ठेवण्यासाठी खासगी डिटेक्टिव्हकडे चौकशी केली आहे. नोकरीसाठी पुण्यात येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या पालकांना मुलांच्या सुरक्षेची चिंता खाऊ लागली आहेच मात्र, आपल्या मुलांची संगत कशी आहे? तो पुण्यात कसा, कुठे राहतो? काय काय करतो, याची माहिती काढण्यासाठी कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर चक्क डिटेक्टिव्हची मदत घेतली जात आहे.
पुण्यात महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या मुलांच्या पालकांना आतापर्यंत पुण्याची चिंता नव्हती. मात्र, कल्याणीनगर कार अपघातानंतर पब आणि बारचे वास्तवही सर्वांसमोर आले आहे. यामुळेच पालकांना आपल्या मुलांची अधिक काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे काही पालकांनी गुप्तहेरांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कालिचरण महाराजांना ‘ते’ वक्तव्य पडणार महागात; राज्य महिला आयोगाचं नाशिक पोलिसांना पत्र
-एकच लक्ष्य ६५ हजार वृक्ष! चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प
-प्रांताधिकार्याचे आरोप, जिल्हाधिकारी दिवसेंनी सांगितलं सत्य; नेमकं प्रकरण काय?
-“‘हे’ उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे”- नितेश राणे