पुणे : पुणे अपघातानंतर आता पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण समोर आले आहे. शिरूर तालुक्यातील पोलीस पाटलाने अल्पवयीन मुलाच्या हातात स्टेअरिंग दिले आणि मुलाने दुचाकीस्वाराला चिरडलं आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अपघातात अरुण विठ्ठल मेमाणे (वय ३०) यांचा मृत्यू झाला असून महेंद्र रावसाहेब बांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. अल्पवयीन मुलगी पीकअप गाडी चालवत होती. या अपघातामध्ये अल्पवयीन मुलाच्या गाडीचा वेग इतका होता की, त्याच्या गाडीने मृत तरुणाला ३० ते ४० फूट फरपट नेले आहे.
शिरुर तालुक्यातील वडगाव बांडे-आरणगाव रोडवर पोलीस पाटील संतोष लेंडे यांनी आपल्या अल्पवयीन मुलीला पीक अप गाडी चालवण्यासाठी दिली होती. पाटील स्वतः दुसऱ्या सीटवर बसले. याच रस्त्यावरून दुचाकीस्वार महेंद्र बांडे आणि अरुण मेमाणे हे डीपीचे ऑईल न्हावरेगावाकडे जात होते.
पीक अप गाडीची दुचाकीला जोरात धडक बसून दुचाकीवरील तरुण खाली पडले. यातील अरुण मेमाणे हा पीक अपच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याला गाडीने जवळपास ३० फुटांपर्यंत फरपटत नेले. त्यात त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडल्यानंतर पिक अप मालक घटनास्थळी न थांबता तेथून निघून गेला. त्यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार देण्यात आली आहे. याबाबत मृत युवकाचा भाऊ सतिश विठ्ठल मेमाणे याने शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कालिचरण महाराजांना ‘ते’ वक्तव्य पडणार महागात; राज्य महिला आयोगाचं नाशिक पोलिसांना पत्र
-एकच लक्ष्य ६५ हजार वृक्ष! चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प
-प्रांताधिकार्याचे आरोप, जिल्हाधिकारी दिवसेंनी सांगितलं सत्य; नेमकं प्रकरण काय?
-“‘हे’ उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे”- नितेश राणे
-जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रांताधिकाऱ्यांनी केली बदलीची मागणी