पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील, आजोबा, पब चालक, व्यवस्थापक यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर आज या आरोपीच्या आईलाही अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर आरोपीला वाचवण्यासाठी जे जे काही प्रयत्न झाले त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर संशय घेत अनेक आरोप केले गेले, अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. सुनील टिंगरे यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टिंगरेंची पाठराखण केली आहे.
“गुन्हा, अपघात रात्री उशिरा घडला आहे. शक्यतो रात्री उशिरा आपण सगळेजण झोपलेला असतो. त्यांना कुणाचा तरी फोन आला आता फोन कोणाचा आला काय आला त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेले आणि त्यानंतर ते तो (सुनील टिंगरे) पोलीस स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशनमध्ये कुठेही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीने त्याने (सुनील टिंगरे) सांगितले नाही” असे सांगत अजित पवारांनी सुनील टिंगरेंची पाठराखण केली आहे.
“काही जण तर माझ्याबरोबरच घसरत आहेत. तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता मला माझ्या जवळचा जरी कार्यकर्ता चुकला तरी मी तिथं जर तो चुकीचा वागलेला असेल, कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर, मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो संबंधितांना टायरमध्ये घ्या आणि जे काही नियमाने कारवाई ती त्या करा.
“या बाबत शेवटी आमदार म्हणून मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांच्या कानावर आल्यानंतर असं कोणी केलं का की याच्यामध्ये ते प्रकरण दाबायचा प्रयत्न केला? घटना घडल्यानंतर पुन्हा दाखल करण्यासाठी जी कारवाई पोलिसांनी कार्याला पाहिजे ते करून दिली नाही? वगैरे असं काही झाले नाही. सगळी गोष्ट ज्या त्या पद्धतीने झालेली आहे. परंतु याच्यात काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोकांनी चुका केल्या त्या चुका लक्षात आल्यानंतर चौकशीमध्ये त्यांच्यावर जी कारवाई करायला पाहिजे होती, त्या त्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठांनी ती कारवाई केलेली आहे. सुनील टिंगरे यांच्यावर जे आरोप होत आहेत, ते आरोप बिनबुडाचे आहेत”, असे अजित पवारांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे हिट अँड रन: आरोपीची आई शिवानी अग्रवालला अटक; बदलेले ब्लड सॅम्पल कोणाचे?
-एकच लक्ष्य ६५ हजार वृक्ष! चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प
-प्रांताधिकार्याचे आरोप, जिल्हाधिकारी दिवसेंनी सांगितलं सत्य; नेमकं प्रकरण काय?
-“‘हे’ उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे”- नितेश राणे
-जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रांताधिकाऱ्यांनी केली बदलीची मागणी