पुणे : सध्या राज्यात पोर्शे कार प्रकरणावरुन तुफान चर्चा सुरु आहे. अल्पवयीन मुलाचे कार अपघात प्रकरण सध्या राज्यात केंद्रस्थानी आहे. या प्रकरणावरुन राज्यातील राजकारणात तुफान खडाजंगी सुरु आहे. त्यातच पुण्यातील ३७ कंपन्या पुणे शहरातून बाहेर गेल्याची माहितीही काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती.
यावरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. उद्धव ठाकरे लंडन दौऱ्यावर असल्याने, आमदार नितेश राणेंनी त्यांच्या लंडन दौऱ्याचा उल्लेख करत पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकार काळातच या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्याचे नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणे शिर्डीत पत्रकारांशी बोलत होते.
“पुण्यातील जेवढ्या कंपन्या बाहेर गेल्या, त्या कोरोना काळात गेल्या आहेत. उध्दव ठाकरेंच्या सरकारच्या काळातच या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या. उध्दव ठाकरे लंडनमध्ये बसून खोटी माहिती देत आहेत. ठाकरेंना लंडनहून परत येवू द्यायचे का? याचा महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. लंडनमध्ये बसून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करणाऱ्यांना लंडनमध्येच पॅकअप करा. तसेच, कंपन्या आत्ता गेल्या हे उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावे”, असे नितेश राणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रांताधिकाऱ्यांनी केली बदलीची मागणी
-रवींद्र धंगेकरांनी पुण्याला दिली उडता पंजाबची उपमा; म्हणाले, “उमलती फुले कोमजण्याचे काम…”
-पुण्यात धक्कादायक प्रकार; जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न
-एमपीएससीच्या PSI परिक्षेचा निकाल जाहीर; पुण्यातील अजय, मयुरीने मारली बाजी