पुणे : मराठा आंदोलकांचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुण्यातील कोथरुड येथे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते. त्या प्रकरणी मनोज जरांगे आज पुणे न्यायालयामध्ये हजर झाले आहेत. या संदर्भात जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुणे न्यायालयामध्ये दुपारी १२ वाजता पोहचले. न्यायालयाने त्यांना २०१३ साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते.
त्यानंतर ते न्यायालयासमोर न्यायालयात हजर झाले. त्यावेळी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ‘न्यायालयाच्या समोर सर्व समान आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मी न्यायालयात हजर झालो आहे. याविषयी अधिक बोलणे योग्य होणार नाही’ असे जरांगे पाटलांनी सांगितले आहे.
जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने २०१३ साली एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आलेले नव्हते, असा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कलम १५६(३) प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन देखील मिळालेला होता. याच प्रकरणात त्यांना आता न्यायालयाने वॉरंट बजावले होते.
पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मनोज जरांगेंना मोठा दिलासा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट रद्द करण्यात आले आहे. तसेच वॉरंट रद्द करताना कोर्टाने त्यांना ५०० रुपयाचा दंड देखील ठोठावला आहे. एक जमीनदार द्यायला सांगितला आहे. २०१३ मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्यात जरांगेंविरोधात वॉरंट जारी झालं होतं. त्यानंतर जरांगे आज कोर्टात हजर झाले. मी न्यायालयाचा आदर करतो, न्याय सर्वांसाठी समान आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी कोर्टात जाण्याअगोदर दिली होती.
महत्वाच्या बातम्या-
-आरोपींना वाचवण्यासाठी नको ते उपद्वाप; ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी मध्यरात्री गाडीतून कोणाला आणलं?
-स्वा. सावरकरांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींना पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
-राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पब, बारमध्ये कठोर नियम लागू; रात्री किती वाजेपर्यंत सुरु राहणार?
-तुमची मुले मोबाईलमध्ये अडल्ट Video पाहतात का? मग आजच मोबाईचे ‘हे’ सेटिंग्ज चेंज करा
-महिलांसाठी महत्वाची बातमी; दरवर्षी करा ‘या’ ६ मेडिकल टेस्ट नक्कीच करा, टळू शकतो गंभीर आजारांचा धोका